सुधीर आडीवरेकर यांचा वाढदिवस सावंतवाडी भाजपच्या वतीने साजरा…!

⚡सावंतवाडी ता.०४-: भाजपा शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांचा वाढदिवस सावंतवाडी तालुका भाजपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित यांकडून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग जिल्हा सदस्य मनोज नाईक मंडल सरचिटणीस दिलीप भालेकर संजू शिरोडकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेविका दिपाली भालेकर,कुणाल सावंत, अमित गवडळकर,…

Read More

सावंतवाडी व दोडामार्ग राष्ट्रीय कर्मचारी सेना शिवसेना तालुकाप्रमुख पदी परिक्षीत मांजरेकर…!

⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी व दोडामार्ग राष्ट्रीय कर्मचारी सेना शिवसेना तालुकाप्रमुख पदी परिक्षीत मांजरेकर यांची नेमणूक करण्यात आली. ही नेमणूक शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजू परब यांनी केली असून यावेळी सावंतवाडी आगाराचे अध्यक्ष महादेव उर्फ बाबा नाईक,सचिव शिवराम मुळीक ,खजिनदार संतोष देसाई ,संघटक सचिव विठ्ठल सावंत,सदस्य रविंद्र परब आदी उपस्थित होते

Read More

वेंगुर्ले भटवाडी-आडीपुल येथे एसटी बस व आयशर टेम्पो समोरासमोर धडकल्याने अपघात…!

⚡वेंगुर्ले ता.०३-: वेंगुर्ले आगाराच्या सकाळी 8 वाजता सुटलेल्या वेंगुर्ले कुडाळ कणकवली मार्गे स्वारगेट वल्लभनगर येथे एम.एच.-13- सीयु -7845 ही पुण्यात प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस व कोल्हापूर येथून वेंगुर्ले शहरात येणारा आयशर टेम्पो एम.एच.-34- बी. झेड.- 6952 यांची सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास आडीपूल-भटवाडी स्टॉप नजीकच्या वळणावर समोरासमोर धडक बसली. या अपघातात एसटी बसमधील चालकासह 9…

Read More

माजी विद्यार्थी हा प्रशालेचा आधारस्तंभ…

सरपंच भगवान लुडबे:रेकोबा हायस्कूलच्या वर्धापन दिन आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.. ⚡मालवण ता.०३-:माजी विद्यार्थी शाळेला विविध रूपात मदत करतात. शाळेची आठवण काढतात हे अभिमानास्पद आहे. माजी विद्यार्थी हा प्रशालेचा आधारस्तंभ आहे असे प्रतिपादन वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. भगवान लुडबे यांनी येथे बोलताना केले. मालवण वायरी येथील रेकोबा हायस्कूलचा ४६ वा वर्धापन दिन व विद्यार्थी…

Read More

विद्यार्थ्यांनी कीर्तीवंत होतानाच आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करावे…

सायली गुरव:वाघेरी गुरववाडी शिक्षणप्रेमी व गुरव बांधवांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.. ⚡कणकवली ता.०२-: सध्याचे स्पर्धेचे युग आहे. या युगात यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रमांची जोड द्यायला हवी. विद्यार्थ्यांनी नियोजनबध्द अभ्यास करायला हवा. यशवंत विद्यार्थ्यांनी कीर्तीवंत होतानाच आपल्या गावाचे पर्यायाने देशाचे नाव उज्ज्वल करावे.असे आवाहन अखिल गुरव समाज महीला जिल्हाध्यक्षा तथा कणकवली केंद्र शाळा मुख्याध्यापिका…

Read More

कुडाळमध्ये कोसळत्या धारा ; कर्ली नदी इशारा पातळी वरून…

गेल्या २४ तासात १७५ मिमी पावसाची नोंद:कुडाळमध्ये दहा कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलविले.. ⚡कुडाळ ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. कुडाळ तालुक्यात सुद्धा कोसळत्या धारांनी जनजीवन विस्कळीत केले आहे. गेल्या २४ तासात कुडाळ मध्ये १७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्ली नदी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. कर्ली…

Read More

सीताराम उर्फ दाजी सावंत यांनी प्रामाणिकपणे पोलीस खात्याची सेवा केली…

सेवानिवृत्तीनिमित एसपी दहिकर यांचे गौरवोद्गार:कणकवली पोलीस ठाण्याच्या वतीनेही करण्यात आला सपत्नीक सत्कार.. ⚡कणकवली ता.०३-: सीताराम उर्फ दाजी सावंत यांनी महाराष्ट्र पोलीस दलात अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली. आपले कर्तव्य चोख पार पाडतानाच आपल्या पोलीस दलाच्या सेवकाळात दाजी सावंत यांनी सेवाभावी वृत्तीने अभ्यागताना न्याय दिला. सेवानिवृत्तपर आयुष्यात त्यांनी आपल्या कुटुंबियांना वेळ द्यावा. निरामय निरोगी असे उर्वरीत आयुष्य…

Read More

शक्तिपीठ मार्ग लोकांच्या हितासाठी…

पालकमंत्री नितेश राणे: विरोधकांकडून लोकांमध्ये गैरसमज पसरवून त्यांची डोकी भडकवण्याचे काम सुरू.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता ३-: शक्तिपीठ महामार्ग संदर्भात येथील लोकांमध्ये गैरसमज पसरवून त्यांची डोकी भडकवण्याचे काम विरोधकांचे सुरू आहे.हे मी कदापी खपून घेणार नाही.असे सांगतानाच शक्तिपीठ महामार्ग होताना जो यामध्ये बाधित होईल अशा प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच शक्तिपीठ महामार्ग होणार आहे. आत्ता असलेला जो शक्तिपीठ महामार्गाचा…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस…

कणकवलीत बऱ्याच भागांमध्ये पुरसदृश्य स्थिती ; वाहतूक ठप्प.. ⚡कणकवली ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी रात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली आचरा राज्य महामार्गावर पाणी आल्याने गुरुवारी सकाळपासून वाहतूक ठप्प झाली आहे. आचरा राज्यमार्गावर पाणी आले असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने वाहनचालकांना सतर्कतेसाठी आचरा मार्गावर बॅनर लावण्यात आले असून वरवडे गावातून बिडवाडी मार्गे पर्यायी वाहतूक वळविण्यात आली…

Read More

गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे घवघवीत यश…!

⚡सावंतवाडी ता.०३-: गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत तालुका आणि जिल्हा गुणवत्ता यादीत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अव्वल गुण प्राप्त करुन घवघवीत यश संपादन केले.जिल्हा गुणवत्ता यादीत इयत्ता सहावीचा विद्यार्थीसर्वेश नितीन गावडे तसेचतालुका गुणवत्ता यादीतअर्णव अमोल माने इयत्ता सहावीविराज शशिकांत गवस इयत्ता सहावीगौरांग संदीप पेडणेकर इयत्ता सातवीतेजस दयानंद आर्दळकर इयत्ता सातवीचैतन्य गणेश पवार इयत्ता सातवी या विद्यार्थ्यांनी अव्वल…

Read More
You cannot copy content of this page