⚡सावंतवाडी ता.०१-: कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगाव आयोजित , जिल्हास्तरीय शालेय कथाकथन स्पर्धेत, आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल आरोस या विद्यालयाच्या इयत्ता सातवीतील कु. श्रेया श्रीकृष्ण खोत हिने प्रथम क्रमांक तर कु. पूर्वा शत्रुघ्न मुळीक हिने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला.
या यशाबद्दल आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष रोहिदास सावंत, उपाध्यक्ष निलेश परब, सेक्रेटरी राजन नाईक, मुख्याध्यापक शिरीष नाईक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले.
या विद्यार्थींना विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका देवयानी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
विद्या विकास हायस्कूल , आरोस चे कथाकथन स्पर्धेत यश…
