दीपक केसरकरांच्या विकासकामांचा मला निश्चित लाभ होईल…

झेवियर फर्नांडिस: ९ तारखेला गुलाल आमचाच..

⚡ सावंतवाडी ता.०१-:
इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघात दीपक केसरकर यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. या विकासकामांचा निश्चितच मला निवडणुकीत फायदा होईल, असा विश्वास शिंदे शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार झेवियर फर्नांडिस यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, माझ्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत, त्यांना मी आव्हान मानत नाही. आजपर्यंत या मतदारसंघात अपक्ष उमेदवारांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, तरीही मी कोणतीही गाफिलपणा न करता माझ्या परीने जोमाने प्रचार करत आहे. मतदारसंघातील जनतेचा मला चांगला प्रतिसाद मिळत असून जनता मला बहुमताने निवडून देईल, असा ठाम विश्वासही झेवियर फर्नांडिस यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page