⚡सावंतवाडी ता.०१-: प्रतिष्ठित सुभाषचंद्र बोस आयएनए ट्रस्टचे सल्लागार म्हणून तीन वर्षांसाठी सुरेंद्र विजयराव भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या श्रीमती अनिता सुभाषचंद्र बोस फाफ या ट्रस्टच्या Patron आहेत. ब्रिगेडियर आर. एस. चिकारा हे ट्रस्टचे अध्यक्ष असून निधी कुमार या ट्रस्टच्या सेक्रेटरी आहेत.
हे ट्रस्ट भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. सुरेंद्र भोसले यांना माननीय पंतप्रधानांच्या स्वप्नातील नेताजी
सुभाषचंद्र बोस यांच्या प्रोजेक्ट वर काम करण्याची संधी मिळत आहे.
भोसले यांची सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असून त्यांना अंदमान व निकोबार बेटांवर श्री विजयापुरम येथे झालेल्या “पराक्रम दिवस” समारंभासाठी खास निमंत्रित करण्यात आले होते.
भोसले यांच्या आयएनए ट्रस्टचे सल्लागारपदी नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सुभाषचंद्र बोस आयएनए ट्रस्टचे सल्लागार म्हणून सुरेंद्र भोसले यांची नियुक्ती…
