⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी येथील मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूलमध्ये शाळा व्यवस्थापन समिती व विद्यार्थी सुरक्षा समिती यांची संयुक्त सभा यशस्वीपणे पार पडली. या सभेत विद्यार्थी ऑनलाईन हजेरी, विद्यार्थी उपस्थिती, शालेय सहल तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या सभेला शाळा व्यवस्थापन समितीचे स्थानिक प्राधिकरण सदस्य मंगेश तळवणेकर, विद्यार्थी सुरक्षा समितीच्या स्थानिक प्राधिकरण सदस्या भारती मोरे, श्रेया देसाई, अलका कासकर, भगवान राऊळ, समीर गावडे, अब्दुल खान उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष किरण सावंत, अमिता पडते, स्मिता नाटेकर, बबिता सांगळे, सिद्धी सावंत, संगीता गवंडळकर, योगेश वाडकर यांच्यासह सर्व सदस्य व पालक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी दोन्ही समित्यांच्या वतीने प्रशालेतील उपक्रमशील शिक्षिका प्राजक्ता कांबळे यांची शिक्षक कर्मचारी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झालेल्या निवड व सहभागाबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सभेदरम्यान मंगेश तळवणेकर यांनी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मिलाग्रीस मराठी प्रशालेत शाळा व्यवस्थापन व विद्यार्थी सुरक्षा समितीची संयुक्त सभा संपन्न…
