Headlines

प्रयोग कापणी आधारीत ऐवजी सरसकट नुकसान भरपाई द्यावी…

छत्रपती शिवाजी महाराज सिधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे मागणी.. ⚡वेंगुर्ला ता.३१-: सन २०२४-२५च्या खरीप हंगामातील भात पिकाचा विमा भरण केलेल्या शेतक-यांना प्रयोग कापणी आधारीत उत्पन्नाला नुकसान भरपाई मिळणार आहे. हा निषक बाजूला ठेऊन सरसकट विमा कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारची मागणी छत्रपती शिवाजी महाराज सिधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे वेंगुर्ला तालुका कृषी अधिका-यांकडे केली आहे. फोटोओळी…

Read Full News

पाठपुरावा करून काम मार्गी लावण्यात वालावलकर यांचा हातखंडा…

आमदार केसरकर:शिदे सेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.. ⚡वेंगुर्ला ता.३१-: सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर यांना स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. नेहमी भक्तीत लीन असणारे वालावलकर समाजकार्यातही सहभागी होतात. एखाद्या कामाचा सतत पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा आहे. आज त्यांनी आपल्या वाढदिवसादिवशी प्रवेश घडवून आणले. त्यामुळे पक्षाची ताकद वाढली असून एक उर्जा…

Read Full News

मालवण पोलिसांच्या ‘रन फॉर युनिटी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सरदार पटेलांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजन ; पोलीस, विविध संस्था, नागरिकांचा सहभाग… ⚡मालवण,ता.३१-:राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधत आज पोलीस दलाच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ एकता दौड आयोजित करण्यात आली होती. या भव्य दौडला नागरिक, विविध संस्थांचे सदस्य आणि पोलीस दलातील अधिकारी- कर्मचारी यांचा उत्स्फूर्त…

Read Full News

मालवण वीज कार्यालयातील वीज बिल भरणा केंद्र बंद करू नये…

काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी:अभियंत्यांना निवेदन सादर.. ⚡मालवण ता.३१-:वीज महावितरण कंपनीच्या मालवण उपविभाग कार्यालयाच्या आवारातील सुरू असलेले वीज बिल भरणा केंद्र हे हे उपविभाग स्तरावर कॅशिअर (रोखपाल) हे पद नसल्यामुळे १ नोव्हेंबर पासून बंद करण्यात येत असल्याने याबाबत आज राष्ट्रीय काँग्रेस व ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या पदाधिकाऱ्यांनी वीज कार्यालयात धडक देत वीज अभियंता श्री. सचिन म्हेत्रे…

Read Full News

काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी करावी…

अँड. दिलीप नार्वेकर:तालुका काँग्रेस आघाडीसाठी प्रयत्नशील झाली नाही, तर आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवू; महेंद्र सांगेलकर.. ⚡सावंतवाडी, ता.३१-: सावंतवाडी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी करावी, असे आवाहन काँग्रेस नेते व माजी नगराध्यक्ष अँड.दिलीप नार्वेकर यांनी केले.ते सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी श्री. सांगेलकर म्हणाले, “महाविकास…

Read Full News

निती आयोगाच्या शिष्टमंडळाची पोलिस अधीक्षक कार्यालयाला भेट…

सिंधुप्रहरी’ कार्यप्रणालीची जाणून घेतली माहिती:परिवहन विभागानेही केले सादरीकरण.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा प्रभावी वापर सुरू केला असून, या मॉडेलचा सखोल अभ्यास करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी निगडित नीती आयोगाची विशेष टीम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. याच अनुषंगाने निती आयोगाच्या पथकातील डॉ. देवव्रत त्यागी आणि श्रीमती विदीशा दास यांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षक…

Read Full News

मळगाव येथे साकारला जंजिरे सिंधुदुर्ग ..

इतिहासप्रेमी ज्ञानेश्वर राणे याचा पर्यावरणपूरक उपक्रम.. सावंतवाडी : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या किल्ले जंजिरे सिंधुदुर्ग ची आकर्षक प्रतिकृती मळगाव येथील इतिहास व किल्ले संस्कृतीप्रेमी ज्ञानेश्वर गोविंद राणे या तरुणाने आपल्या घराच्या अंगणात साकारून एकप्रकारे गड-किल्ले संवर्धनाचा संदेश दिला आहे. इतिहासाची ओढ, शिवकालीन किल्ल्यांबद्दलचे प्रेम व जिव्हाळा आणि हातातील कौशल्य यांच्या जोरावर राणे याने…

Read Full News

मळगाव येथे ४ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन…

दुर्वांकुर कला क्रीडा मंडळाचे आयोजन.. सावंतवाडी : दुर्वांकुर कला क्रीडा मंडळाच्यावतीने मळगाव- आजगावकर गोसावीवाडी येथील श्री दत्त मंदिर येथे मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७. ०० वाजता जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.भजन स्पर्धेचे यंदाचे ५ वे वर्ष आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक-७००१/- दाजी आजगावकर पुरस्कृत, द्वितीय पारितोषिक ५००१/ कै. आनंदी अमरे यांच्या…

Read Full News

‘त्या’ पर्यटकांचे प्राण वाचवणाऱ्या सहा तरुणांचा भाजपकडून सन्मानपत्र’ देऊन गौरव…

⚡वेंगुर्ले ता.३१-: शिरोडा–वेळागर समुद्रकिनारी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या शूर नागरिकांचा गौरव करण्यासाठी भारतीय जनता पार्टी च्या वतीने शिरोडा – वेळागर येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन “ वीरता सन्मानपत्र ” शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला . या सोहळ्यात आजू आमरे, आबा चिपकर, नेल्सन सोझ, समीर भगत, संतोष भगत आणि सूरज आमरे या 6…

Read Full News

तळेखोलमध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश…!

⚡सावंतवाडी,ता.३१-:“विकास हा आमचा धर्म आणि सेवा ही आमची ओळख” या ध्येयवाक्याने प्रेरित होत तळेखोल गावातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.या प्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वावर, मा. खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनावर आणि युवा नेते विशाल परब यांच्या संघटन कौशल्यावर ठेवलेला विश्वास ठेवत त्यांनी प्रवेश केला…

Read Full News

You cannot copy content of this page