छत्रपती शिवाजी महाराज सिधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे मागणी..
⚡वेंगुर्ला ता.३१-: सन २०२४-२५च्या खरीप हंगामातील भात पिकाचा विमा भरण केलेल्या शेतक-यांना प्रयोग कापणी आधारीत उत्पन्नाला नुकसान भरपाई मिळणार आहे. हा निषक बाजूला ठेऊन सरसकट विमा कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारची मागणी छत्रपती शिवाजी महाराज सिधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे वेंगुर्ला तालुका कृषी अधिका-यांकडे केली आहे.
सद्यस्थितीत परतीच्या पावसामुळे भातपिकाचे नुकसान झाले आहे. त्याचे कृषी विभागांकडून पंचनामेही सुरू आहेत. परंतु, शासन निर्णयानुसार प्रयोग कापणी आधारित भात पिक भरलेल्या जिल्ह्यांतील शेतक-यांना नुकसान भरपाई मिळणार याबाबत शेतक-यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. पूर्वीप्रमाणे टोल फ्री नंबरवर करून विमा कंपनीला शेतकरी विमा कंपनीला शेतकरी विमा कंपनीला कळवत होते. त्यानंतर विमा प्रतिनिधी त्या बाधित क्षेत्रावर जाऊन प्रत्यक्ष शेतक-यांची पंचनोम करत होते. परंतु, त्यांनाही प्रयोग कापणी निकषावर असल्यामुळे तशाप्रकारे कंपनीचा आदेश नाही. त्याकरीता चालू वर्षी सिधुदुर्ग जिल्ह्यातील शेतक-यांची विमा कंपनीकडे व कृषी विभागाकडे पुढील अहवाल सादर करून शेतक-यांचा प्रयोग कापणी निकष बाजूला ठेऊन सरसकट विमा भरपाई द्यावी. जर शेतामध्ये भात धान कुजून गेले तर कापणी प्रयोगाचा प्रश्नच उद्भवत नाहीत. उत्पन्नच घटले असून हा निकष जेणेकरून सिधुदुर्ग जिल्ह्यापुरता तरी लागू करू नये, बिना निकषाशिवाय नुकसान भरपाई द्यावी. तसेच चालू वर्षीची परिस्थिती लक्षात घेता विमा कंपनीने विलंब न लावता भात पिकाचा विमा शेतक-यांना तात्काळ विमा नुकसान भरपाई द्यावी असे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन सादरकरतेवेळी शामसुंदर राय, संजय कोंडसकर, प्रदिप सावंत, सुरेश धुरी, यतिन पेडणेकर, राजेश पेडणेकर, उत्तम नाईक, प्रदिप नाईक, प्रदिप नाईक, आनंद गावउे, मेघश्याम भगत, सुभाष भगत, राजन आरोसकर, प्रकाश गोळम, विनायक गवंडे, प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.
फोटोओळी – सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सिधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.
