पाठपुरावा करून काम मार्गी लावण्यात वालावलकर यांचा हातखंडा…

आमदार केसरकर:
शिदे सेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

⚡वेंगुर्ला ता.३१-: सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर यांना स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. नेहमी भक्तीत लीन असणारे वालावलकर समाजकार्यातही सहभागी होतात. एखाद्या कामाचा सतत पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा आहे. आज त्यांनी आपल्या वाढदिवसादिवशी प्रवेश घडवून आणले. त्यामुळे पक्षाची ताकद वाढली असून एक उर्जा प्राप्त झाली आहे. याबाबत सचिन वालावलकर यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे प्रतिपादन माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी शुभेच्छा देताना केले.

येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिदे सेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांचा वाढदिवस स्वामिनी मंगल कार्यालयात गुरूवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांची पत्नी समिक्षा, मुलगी स्वानंदी व स्वरा यांच्यासह आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर, शहराध्यक्ष उमेश येरम, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद डेरे आदी उपस्थित होते. याचवेळी शिदे सेनेचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यात आडेली, वायंगणी येथील ग्रामस्थांनी सेनेत प्रवेश केला.
सचिन वालावलकर यांच्यासारखा हुशार माणूस नाही. ज्याप्रमाणे दीपक केसरकर यांना साथ देतात तेवढीच साथ आम्हालाही द्या, असे आमदार निलेश राणे यांनी वालावलकर यांना शुभेच्छा देताना सांगितले. अभ्यासू आणि हुशार व्यक्तिमत्व म्हणून सचिन वालावलकर यांच्याकडे आम्ही पहातो. त्यांनी राजकारणात प्रवेश करून मोठे पद भूषवावे अशी माझी इच्छा असल्याचे दत्ता सामंत शुभेच्छा देताना म्हणाले. तर सिधुरत्न योजना तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांसाठी पोषक आहे. या योजनेतून बरीच कुटुंबे उभी राहिली आहेत. याचे श्रेय श्री. केसरकर यांना जाते. या योजनेच्या माध्यमातून मी ७ ते ८ कोटींचे प्रश्न सोडविले आहे. सिधुरत्न योजना पुन्हा एकदा सुरू व्हावी असे सांगत पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचा सन्माना राखला जाईल असे सामंत यांनी सांगितले.
मागील निवडणुकीत सेनेच्या प्रत्येक पदाधिका-यांनी जोमाने काम केले आहे. पाच वर्षात निधी कमी पडू दिला नाही. विकासात्मक कामामुळेच सेनेत येणा-यांची संख्या वाढली असल्याचे सांगत आपल्या वाढदिवसाला उपस्थित राहून आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्याबद्दल सचिन वालावलकर यांनी सर्वांचे आभार मानले. त्यानंतर बांदा येथील महेंद्र मांजरेकर प्रस्तुत ‘दीपसचिन स्वरसंध्या‘ हा कार्यक्रम संपन्न झाला.
फोटोओळी – सचिन वालावलकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

You cannot copy content of this page