⚡सावंतवाडी ता.१४-:
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शाळा क्र. ४ च्या विद्यार्थ्यांनी सावंतवाडी शहरात भव्य आणि उत्साहपूर्ण तिरंगा रॅलीचे आयोजन केले. या रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशप्रेमाचा संदेश देत संपूर्ण सावंतवाडी शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात रंगवून टाकले.
शाळेच्या प्रांगणातून सुरू झालेली ही रॅली सावंतवाडी शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. हातात डौलाने फडकणारा तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ च्या देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. विद्यार्थ्यांमधील हा उत्साह आणि राष्ट्रप्रेम उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.
या उपक्रमात केवळ विद्यार्थीच नव्हे, तर त्यांच्या पालकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी पदवीधर शिक्षिका श्रीम. अनघा अनिल निरवडेकर -, उपशिक्षिका
श्रीम. पूजा शिंदे ,अंजना घाडी,श्रीम. दक्षता गवस,श्रीम. वर्षा नाईक,श्रीम. प्रणीती सावंत ,उपशिक्षक श्री. महेश पालव, यांच्यासह श्रीमती चुनेकर ,श्रीमती काळे, शिक्षिका
शेख व इतर शिक्षिकांनी रॅलीत प्रत्यक्ष सहभागी होऊन विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या योग्य नियोजनामुळे आणि शिस्तीत काढण्यात आलेल्या या रॅलीचे कौतुक होत आहे.
’हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जि. प. शाळा क्र. ४ च्या विद्यार्थ्यांची सावंतवाडीत उत्साहात रॅली…
