मळगाव येथे ४ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन…

दुर्वांकुर कला क्रीडा मंडळाचे आयोजन..

सावंतवाडी : दुर्वांकुर कला क्रीडा मंडळाच्यावतीने मळगाव- आजगावकर गोसावीवाडी येथील श्री दत्त मंदिर येथे मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७. ०० वाजता जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
भजन स्पर्धेचे यंदाचे ५ वे वर्ष आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक-७००१/- दाजी आजगावकर पुरस्कृत, द्वितीय पारितोषिक ५००१/ कै. आनंदी अमरे यांच्या स्मरणार्थ गितेश अमरे व प्रथमेश सावळ पुरस्कृत, तृतीय पारितोषिक-३००१/- कै. लघु सहदेव कळंगुटकर स्मरणार्थ राजेश कळंगुटकर पुरस्कृत तर उत्तेजनार्थ-१५००/- सुहास मळगावकर यांसकडून पुरस्कृत करण्यात आली आहेत. वरील तिन्ही क्रमांकांना व उत्तेजनार्थ क्रमांकाला सन्मानचिन्ह-सिद्धेश आजगावकर यांनी पुरस्कृत केली आहेत. तसेच वैयक्तिक पारितोषिकात उत्कृष्ट हार्मोनियम-हेमंत तानावडे पुरस्कृत, उत्कृष्ट पखवाज वादक-योगेश चिंदरकर पुरस्कृत, उत्कृष्ट तबलावादक-देवानंद राऊळ पुरस्कृत, उत्कृष्ट गायक-बंटी मेस्त्री पुरस्कृत, उत्कृष्ट झांज वादक-योगेश गवंडे पुरस्कृत, उत्कृष्ट कोरस अक्षय राऊळ पुरस्कृत, शिस्तबद्ध संघ-श्री देव समाधी पुरुष प्रासादिक भजन मंडळ मळगाव पुरस्कृत आदी वैयक्तिक पारितोषिकेही ठेवण्यात आली आहेत. सर्व मंडळांना सन्मानचिन्ह चेतन राऊत यांनी पुरुस्कृत केली आहेत.
भजन मंडळांमध्ये श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ, वर्दे बुवा-नरेंद्र मेस्त्री (वेळ-रात्री ८.०० वाजता), श्री देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ, साटेली बुवा- सत्यनारायण कळंगुटकर (वेळ रात्री ८.५० वाजता), श्री ब्राह्मण देव प्रासादिक महिला भजन मंडळ, पावशी बुवा-सौ. प्रियांका तवटे (वेळ- रात्री ९.४५ वाजता), श्री रामकृष्ण हरी सेवा संघ पाट पंचक्रोशी बुवा- आशिष सडेकर (वेळ- रात्री १०.३५ वाजता), श्री मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नेरूर बुवा-भार्गव गावडे (वेळ-रात्री ११.२५ वाजता), श्री सद्गुरु संगीत भजन मंडळ, पिंगुळी बुवा-वैभव सावंत (वेळ- मध्यरात्री १२.१५ वाजता), श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, कणकवली बुवा-योगेश मेस्त्री (वेळ-मध्यरात्री १.०५ वाजता), श्री सद्गुरु प्रासादिक भजन मंडळ, अणसुर-वेंगुर्ले बुवा-हर्षल मेस्त्री (वेळ- मध्यरात्री १.५५ वाजता), श्री सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळ, कणकवली-जानवली बुवा-दुर्गेश मिठबावकर (वेळ-मध्यरात्री २. ४५ वाजता) आदी ९ संघ निमंत्रित करण्यात आले आहेत. भजन मंडळांन प्रत्येकी ४५मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. निवेदक म्हणून संदीप दळवी काम पाहणार आहेत. मळगाव तसेच परिसरातील भजनप्रेमींनी या भजन स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page