‘त्या’ पर्यटकांचे प्राण वाचवणाऱ्या सहा तरुणांचा भाजपकडून सन्मानपत्र’ देऊन गौरव…

⚡वेंगुर्ले ता.३१-: शिरोडा–वेळागर समुद्रकिनारी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या शूर नागरिकांचा गौरव करण्यासाठी भारतीय जनता पार्टी च्या वतीने शिरोडा – वेळागर येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन “ वीरता सन्मानपत्र ” शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला .

या सोहळ्यात आजू आमरे, आबा चिपकर, नेल्सन सोझ, समीर भगत, संतोष भगत आणि सूरज आमरे या 6 धाडसी तरुणांचा भाजपाच्या वतीने सन्मान करण्यात आला . शिरोडा–वेळागर समुद्रकिनारी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविताना या युवकांनी दाखविलेल्या पराक्रम, तत्परता आणि निःस्वार्थ वृत्तीचा गौरव म्हणून हा “वीरता सन्मानपत्र” प्रदान करण्यात आल्याचे शिरोडा शक्तिकेंद्र प्रमुख मयूरेश शिरोडकर यांनी प्रास्ताविकात सांगीतले.भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी सांगितले की, “मानवी जीवन वाचविणे हे सर्वोच्च कर्तव्य आहे. संकटाच्या क्षणी जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचविण्याचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. अशा नागरिकांचा सन्मान करणे म्हणजे मानवतेच्या मूल्यांना अभिवादन करणे होय.”या कार्यक्रमांस तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब , जि.का.का.सदस्य सुहास गवंडळकर, मनवेल फर्नांडिस , मच्छिमार सेल जिल्हाध्यक्ष वसंत तांडेल, दादा केळुसकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , शिरोडा शहर अध्यक्ष अमित गावडे , ता.चिटणीस श्रीकृष्ण धानजी , राहुल गावडे , शक्तिकेंद्र प्रमुख विजय बागकर व महादेव नाईक , आसोली उपसरपंच संकेत धुरी , विजय पडवळ , संतोष अणसूरकर , अभय बर्डे , सोमाकांत सावंत , बाळु वस्त , दादा शेटये , दत्ताराम फटजी , वासुदेव आरोसकर , समृद्धी धानजी, स्नेहा गोडकर , प्राजेश गावडे , सचिन वस्त आदी भाजपा कार्यकर्ते तसेच प्रकाश भगत, मदन अमरे, अशोक भगत , सुधीर भगत , श्याम भगत, शेखर भगत, उदय भगत , मिलिंद रेडकर, धनंजय तारी, महादेव चिपकर ,महेंद्र गवंडी, अक्षय आरोस्कर इत्यादी स्थानिक नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page