⚡सावंतवाडी,ता.३१-:
“विकास हा आमचा धर्म आणि सेवा ही आमची ओळख” या ध्येयवाक्याने प्रेरित होत तळेखोल गावातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वावर, मा. खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनावर आणि युवा नेते विशाल परब यांच्या संघटन कौशल्यावर ठेवलेला विश्वास ठेवत त्यांनी प्रवेश केला
या प्रसंगी बोलताना युवा नेते विशाल प्रभाकर परब म्हणाले, “भाजपा हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर तो एक विचार आणि दिशा आहे — राष्ट्रहिताच्या मार्गावर नेणारी दिशा. कोकणात भाजपाचा विस्तार हा केवळ राजकीय घटना नसून विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे.”
कार्यक्रमास माजी तालुका अध्यक्ष रंगनाथ गवस, दोडामार्ग शहराध्यक्ष राजेश फुलारी, शंकर फटि गवस, महेंद्र गवस, महादेव गवस, उमेश महादेव गवस, सगुण नकुळ मोरजकर, अक्षय वासुदेव गवस, रुपेश लक्ष्मण गवस, विजय लक्ष्मण धर्णे, प्रकाश शशिकांत गवस, सुशांत सुरेश गवस, गुरूदास सदा गवस, लक्ष्मण लाडू धर्णे, गीतांजली गुरूदास गवस, शुभम अंकुश गावडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले असून, नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे भाजपाचा पाया तळेखोल परिसरात अधिक मजबूत झाल्याचे निरीक्षण उपस्थितांनी व्यक्त केले.
