Headlines

कर्ज प्रकरणावरून माझी बदनामी करणाऱ्यांचा शोध घ्यावा…

महेश सारंग: पोलीस ठाण्यात तक्रार दाखल,कारवाईची केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडी जिल्हा बँकेत माझ्या नावे व माझ्या कुटुंबियांचे नावे आजमितीपर्यंत कोणतेही कर्ज प्रकरण नसताना केवळ स्वरूपाचा तक्रारी अर्ज दाखल करत माझी बदनामी करणाऱ्या एका व्यक्तीचा शोध घेऊन त्याला पाठीशी घालणाऱ्या विविध विघ्न संतोषी शक्तीचा तपास व्हावा शिवाय त्याच्यावर बदनामी केल्याप्रकरणी फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई करण्यात…

Read Full News

युवासेनेच्या कुडाळ – मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी राजवीर पाटील…

कॅबिनेट मंत्री शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत आमदार निलेश राणे यांच्या उपस्थित नियुक्ती पत्र.. ⚡कुडाळ ता.३०-: युवासेनेच्या कुडाळ – मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी राजवीर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे माजी आमदार राजन तेली, जिल्हा प्रमुख दत्ता…

Read Full News

जिल्ह्यातील पारंपारिक रापण संघांना मत्स्यदुष्काळी आर्थिक सहकार्य मिळावे…

सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजीवी रापण मच्छिमार संघाची मागणी.. ⚡मालवण ता.३०-:गेले ५ वर्षे जिल्ह्यातील पारंपारिक रापण व्यवसायाला उतरती कळा लागली असून जिल्ह्यातील जवळपास १०० च्या वर रापण मासेमारी करणाऱ्या संघांच्या रापण व्यवसायाची आजची परिस्थिती हलाखीची बनली आहे. आधुनिक पद्धतीने होणारी अतिरेकी मासेमारी व त्यामुळे निर्माण झालेला मत्स्यदुष्काळ, पाऊस व वादळसदृश्य परिस्थिती, समुद्राची बिघडलेली स्थिती अशा विविध संकटामुळे…

Read Full News

आंब्रड जि.प. गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…

⚡ओरोस ता ३०-: आंब्रड जि. प. गटातील घोडगे सोनवडे गावातील मोहन घाडीगावकर, रुपेश घाडीगावकर, मोहन घाडी, शुभांगी घाडी, रुपेश घाडीगावकर, श्रावणी घाडीगावकर, पंढरीनाथ घाडीगावकर, जानबा घाडी, प्रकाश गाडी, महेश सावंत, श्रद्धा सावंत, पंढरी सावंत, प्रमोदिनी सावंत, चंद्रभागा घाडीगावकरनंदकिशोर घाडीगावकर, नंदिनी घाडीगावकर, बाबाजी घाडी, बबीता घाडीविजय तेरसे, वासुदेव सावंत, गोपाळ वेतुरेकर, उत्तम कळसुलकर, बाबाजी कळसुलकर, माधवी…

Read Full News

भातशेतीचे तात्काळ पंचनामे करा…

उद्धवसेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन.. ⚡वेंगुर्ला ता.३०-: सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे. हवालदिल झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तात्काळ भातशेतीचे पंचनामे करा अशाप्रकारचे निवेदन उद्धवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी वेंगुर्ला तहसीलदार यांच्याकडे दिले आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. २० ऑक्टोबरपासून वेंगुर्ला तालुक्यामध्ये सतत मुसळधार पाऊस पडत आहे. सध्याचे दिवस…

Read Full News

स्थानिक मावळ्यांकडून ‘प्रतापगड‘ची निर्मिती…

⚡वेंगुर्ला ता.३०-: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहरात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध किल्ल्यांचे दर्शन दिसून येत आहे. यासाठी गेले काही दिवस स्थानिक मावळ्यांनी अतोनात मेहनत घेऊन आकर्षक किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारल्या आहेत. त्यांच्या या कार्यात अवकाळी पावसाचा अडसर निर्माण होत आहे. तरीही बाल मावळ्यांनी वेळ मिळेल तसे किल्ले बनविले आहेत. कॅम्प-देऊळवाडा येथील शंभूराजे मित्रमंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या…

Read Full News

साकेडीचे उपसरपंच प्रज्वल वर्दम अपात्र…

अर्जदार सुरज वर्दम यांच्या वतीने अॅड. विलास परब यांचा युक्तिवाद.. कणकवली : तालुक्यातील साकेडी ग्रामपंचायतीचे भाजपचे उपसरपंच तथा सदस्य प्रज्वल पांडुरंग वर्दम यांना निवडणूक खर्च विहित कालावधीत सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे. हा निर्णय सत्ताधारी भाजपसाठी धक्का मानला जात आहे. सुरज सुरेश वर्दम यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14(ब)(1) अन्वये जिल्हाधिकाऱ्यांकडे…

Read Full News

डिगस तलाव परीसर सुशोभीकरणसाठी अडीज कोटींचा निधी…

आमदार निलेश राणे यांचे निखिल कांदळगावकर यांनी व्यक्त केले आभार.. कुडाळ : तालुक्यातील डिगस-चोरगेवाडी येथील तलाव परीसर सुशोभीकरणसाठी अडीज कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी निखिल कांदळगावकर यांनी आमदार निलेश यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने हा निधी मंजूर झाल्याबाबद्दल श्री. कांदळगावकर यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.राज्य शासनाच्या प्रादेशिक…

Read Full News

बांदा दूध संस्थेकडून शेतकऱ्यांना तब्बल ९ लाख ६१ हजारांचा बोनस वितरण…

⚡बांदा ता.३०-: येथील बांदा पंचक्रोशी सहकारी दुग्ध व्यवसायिक संस्था मर्यादित, बांदा यांनी सालाबादप्रमाणे यंदाही दूध उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल 9 लाख 61 हजार 807 रुपये इतका बोनस वितरित केला आहे. हा बोनस दूध पुरवठ्याच्या 10 टक्के प्रमाणात देण्यात आला असून, या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.यामध्ये प्रथम क्रमांकाचे दूध पुरवठादार शेतकरी जयदीपक गवस यांना…

Read Full News

किल्ले सिंधुदुर्ग नजीकच्या खडकाळ भागात आढळला भल्यामोठ्या शार्क माशाचा सांगाडा…

⚡मालवण ता.३०-:मालवणच्या समुद्रातील किल्ले सिंधुदुर्ग नजीकच्या खडकाळ भागात आज सकाळी भलामोठा शार्क माशाचा कुजलेल्या अवस्थेतील सांगाडा अडकला असल्याचे दिसून आले. मात्र समुद्र खवळलेला असल्याने संबंधित यंत्रणेला तेथपर्यंत पोचणे कठीण बनले आहे. समुद्रातील वादळ सदृश परिस्थितीमुळे गेले काही दिवस किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल रात्री मुसळधार पाऊस कोसळला. समुद्राला आलेल्या उधाणात मध्यरात्री किल्ले सिंधुदुर्ग…

Read Full News

You cannot copy content of this page