स्थानिक मावळ्यांकडून ‘प्रतापगड‘ची निर्मिती…

⚡वेंगुर्ला ता.३०-: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहरात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध किल्ल्यांचे दर्शन दिसून येत आहे. यासाठी गेले काही दिवस स्थानिक मावळ्यांनी अतोनात मेहनत घेऊन आकर्षक किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारल्या आहेत. त्यांच्या या कार्यात अवकाळी पावसाचा अडसर निर्माण होत आहे. तरीही बाल मावळ्यांनी वेळ मिळेल तसे किल्ले बनविले आहेत. कॅम्प-देऊळवाडा येथील शंभूराजे मित्रमंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘प्रतापगड‘ या किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. नव्या पिढीला किल्ल्यांच्या माध्यमातून लागलेली इतिहासाची आवड पाहून सर्वत्र त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले जात आहेत.

You cannot copy content of this page