अर्जदार सुरज वर्दम यांच्या वतीने अॅड. विलास परब यांचा युक्तिवाद..
कणकवली : तालुक्यातील साकेडी ग्रामपंचायतीचे भाजपचे उपसरपंच तथा सदस्य प्रज्वल पांडुरंग वर्दम यांना निवडणूक खर्च विहित कालावधीत सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे. हा निर्णय सत्ताधारी भाजपसाठी धक्का मानला जात आहे.
सुरज सुरेश वर्दम यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14(ब)(1) अन्वये जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जावर झालेल्या सुनावणीत अर्जदारांच्या वतीने अॅड. विलास परब यांनी न्यायालयीन आदेशांचा संदर्भ देत प्रभावी बाजू मांडली.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी 28 ऑगस्ट 2025 रोजी आदेश देत प्रज्वल पांडुरंग वर्दम यांना सदस्य पदासाठी अपात्र घोषित केले. तसेच हा निर्णय सर्व संबंधितांना कळविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
