Headlines

माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनीसहकुटुंब घेतले रेडी येथील श्री नवदुर्ग मातेचे दर्शन…!

⚡वेंगुर्ला ता.२९-:तालुक्यातील रेडी – कनयाळ येथील श्री नवदुर्गा मंदिरात आज प्रसिद्ध क्रिकेटर सुनील गावस्कर व गुंडप्पा विश्वनाथ यांनी सहकुटुंब भेट देत देवीची पूजा केली. यावेळी आयोजित महाप्रसादाचाही त्यांनी लाभ घेतला. रेडी कनयाळ येथील नवदुर्गा माता ही गावस्कर कुटुंबियांची ग्रामदेवता आहे. या मंदिराला लागून सुनील गावस्कर यांनी स्वखर्चातून अन्नछत्र बांधकाम केले आहे. याचे उदघाटन आज सुनील…

Read Full News

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

⚡कणकवली ता.२९-: मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी ३० ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे – गुरुवारी सकाळी ०७.०० वा. मोटारीने विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ०७.३० वा. जनरल एव्हीएशन विमानतळ येथे आगमन व विमानाने गोव्याकडे प्रयाण, सकाळी ०८.३० वा. मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे…

Read Full News

मालवणेत स्वच्छता कामगाराला मारहाण…

कर्मचाऱ्यांनी केला संताप व्यक्त: तात्काळ कारवाई करा, अन्यथा उद्या काम बंद आंदोलन सुरू करणार.. ⚡मालवण ता.२९-:मालवण शहरात कचरा संकलन करताना मालवण नगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कामगार असलेल्या ट्रॅक्टर चालकाला मालवण मधील एकाने मारहाण केल्याच्या निषेधार्थ मालवण नगरपालिकेचे कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी मालवण नगरपालिका प्रशासन व पोलीस स्थानाकात धाव…

Read Full News

गणेश घाट सुशोभीकरणाचे पूर्ण श्रेय्य माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांचेच…

मंदार शिरसाट यांचा प्रसिद्धी पत्रकाद्वारे दावा:तात्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आले असताना मी गणेश घाट सुशोभीकरणाचे काम तात्काळ मंजूर व्हावे अशी मागणी केली होती.. कुडाळ : शहरातील भंगसाळ नदी येथील गणेश घाट सुशोभीकरणाचे संपूर्ण श्रेय माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांचेच असा दावा कुडाळचे माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे….

Read Full News

निवडणुका फॅमिली स्तरावर नाही तर पक्षीय स्तरावर…

आम. निलेश राणे: शिवसेना कोणाच्या विरोधात ही निवडणूक लढवित नाहीय तर जिल्हा परिषद दर्जेदार देण्यासाठी उतरलो.. ⚡कुडाळ ता.२९-: निवडणूका हा विषय फॅमिली स्तरावरचा नसतो तर पक्षीय स्तरावरचा असतो. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस सगळेच स्वतंत्र निवडणूका लढताहेत. आम्ही दोघेच बंधू लढतोय का, नाही ना. त्यामुळे कोणाविरुद्ध कोण नाहीय. प्रत्येक जण आपापल्या पक्षासाठी झटत आहे. मी विरूद्ध…

Read Full News

कुडाळ बस स्थानकात ‘संशयास्पद’ वस्तू ; पोलिसांची मॉकड्रील…

⚡कुडाळ ता.२९-: कुडाळ एसटी स्टॅन्डवर आज पोलिसांच्या बॉम्ब शोध-नाशक पथकाने मॉकड्रिल घेतली. कुडाळ बस स्थानकात एक संशयास्पद सॅक असल्याचे समजल्यावर लोकांनी कशी दक्षता घ्यावी आणि पोलिसांचे बॉम्बनाशक पथक तो बॉम्ब कसा निकामी करतो याचे प्रात्यक्षिक आज बसस्थानकाकांवरील प्रवाशांना पाहायला मिळाले. बीडीएस पथकाचे प्रमुख राजेंद्र गडेकर यांच्या नेतृत्वाखाली हि मॉकड्रील पार पडली.सायंकाळची पाच साडेपाचची वेळ म्हणजे…

Read Full News

आकारीपड जमिनी रिलीज करून आणणाराच…

आमदार निलेश राणे:१७६५.७ हेक्टर जमीन होणार रिलीज.. कुडाळ : माणगाव खोऱ्यातील आकारीपड जमिनीपैकी १७६५.७ हेक्टर जमिनी रिलीज करून आणणार असल्याचं आमदार निलेश राणे यांनी आज जाहीर केलं. आमदार निलेश राणी यांनी आज कुडाळ येथे आकारीपड जमिनीबाबतच्या शासननिर्णयाबाबत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. १७६५.७ हेक्टर जमिनी रिलीज होऊ शकतात. तशी मागणी आपण महसूलमंत्री चंद्रशेखर…

Read Full News

एनडीआरएफच्या निकषावर नुकसानभरपाई द्या…

आमदार निलेश राणे:शेतकरी, बागायतदार आणि मच्छिमार यांचे करोडो रुपयांचे नुकसान.. ⚡कुडाळ ता.२९-: सततच्या आणि लांबलेल्या पावसामुळे कुडाळ मालवण मतदार संघात एकूण लागवड क्षेत्राच्या ३० ते ४० टक्के शेतीचं नुकसान झालं आहे. आंबा बागायतदारांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. मच्छिमार, वॉटरस्पोर्टस यांचं देखील सुमारे २५ कोटींचं आर्थिक नुकसान सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालं आहे. त्यामुळे या सर्वाना एनडीआरएफच्या…

Read Full News

सिंधुदुर्ग किल्ल्याचा देखावा ठरला आकर्षण…

सुकळवाड पाताडेवाडी येथील मुलांनी जोपासली परंपरा.. ⚡मालवण ता.२९-:मालवणी मुलखात दीपावलीच्या काळात वाळूचे गड किल्ले बनविणे हा बच्चे मंडळींचा एक छंद बनला आहे या छंदातूनच बच्चे कंपनी ही वाळूचे किल्ले बनवून आपली कला दाखवीत असतात मालवण तालुक्यातील सुकळवाड पाताडेवाडी येथील कार्तिक अनिल पाताडे व नूतन अनिल पाताडे या भाऊ बहिणीने तसेच दीपराज दीपक जाधव या मुलांनी…

Read Full News

राजकोट किल्ला परिसरात परप्रांतीय फेरीवाल्यांना पोलिसांनी रोखले…

स्थानिक व्यावसायिकांना दिलासा ; कारवाईसाठी शिल्पा खोत यांनी वेधले पोलिसांचे लक्ष… ⚡मालवण ता.२९-:राजकोट किल्ला परिसरात परप्रांतीय फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक छोटे व्यावसायिक त्रस्त झाले होते. त्यांच्या दैनंदिन व्यवसायावर गंभीर परिणाम होत असल्याने या व्यावसायिकांनी अखेर सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांचे लक्ष वेधले. खोत यांनी तातडीने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन स्थानिक व्यावसायिकांना पोलिसांच्या मदतीने दिलासा…

Read Full News

You cannot copy content of this page