राजकोट किल्ला परिसरात परप्रांतीय फेरीवाल्यांना पोलिसांनी रोखले…

स्थानिक व्यावसायिकांना दिलासा ; कारवाईसाठी शिल्पा खोत यांनी वेधले पोलिसांचे लक्ष…

मालवण ता.२९-:राजकोट किल्ला परिसरात परप्रांतीय फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक छोटे व्यावसायिक त्रस्त झाले होते. त्यांच्या दैनंदिन व्यवसायावर गंभीर परिणाम होत असल्याने या व्यावसायिकांनी अखेर सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांचे लक्ष वेधले. खोत यांनी तातडीने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन स्थानिक व्यावसायिकांना पोलिसांच्या मदतीने दिलासा मिळवून दिला.


राजकोट किल्ला हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असल्याने या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात. या संधीचा फायदा घेऊन काही परप्रांतीय फेरीवाल्यांनी या भागात बस्तान मांडले होते. यामुळे स्थानिक व्यवसायिकांच्या व्यवसायावर परिणाम होत होता. स्थानिक व्यावसायिकांनी आपली समस्या शिल्पा खोत यांच्यासमोर मांडताच त्यांनी ही बाब पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या निदर्शनास आणून दिली आणि तात्काळ कारवाई करण्याची विनंती केली.
पोलीस निरीक्षक जगताप यांनीही या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांना राजकोट किल्ला परिसरात पाठवले. त्यांनी या परप्रांतीय फेरीवाल्यांना रोखले.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे स्थानिक व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page