Headlines

मालवण तालूका काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ३० रोजी बैठक…

⚡मालवण ता.२८-:आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसच्या मालवण तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक दि. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वा. मालवण बाजारपेठेतील हॉटेल मालवणी हेरिटेज येथे आयोजित करण्यात आली आहे. आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत या निवडणूकांबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना निवडणुकीबाबत माहिती देणे तसेच विविध मतदारसंघात इच्छुक असलेल्या उमेदवार…

Read Full News

फिझिओथेरपी प्रवेशासाठी सीईटी नोंदणी करण्याचे आवाहन…

दि. ३० ऑक्टोबर शेवटची तारीख :बॅ नाथ पै फिझिओथेरपी कॉलेजमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन.. ⚡कुडाळ ता.२८-: फिजीओथेरपी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांनी नोंदणी करण्याबाबत आवाहन केले आहे. ज्या विद्यार्थी- विद्यार्थीनींना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात ‍फिजीओथेरपी या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांचे नोदणी करणे अनिवार्य…

Read Full News

किर्लोस येथील ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ चव्हाण यांचा शिवसेनेत प्रवेश…

आडवली-मालडी अनुसूचित जाती सेल विभागप्रमुखपदी नियुक्ती.. ⚡मालवण ता.२८-: किर्लोस येथील उबाठा शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ दत्ताराम चव्हाण यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्री. चव्हाण यांची शिवसेनेच्या आडवली मालडी अनुसूचित जाती सेल विभागप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. दत्ता सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…

Read Full News

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…

भातपिकावर संकटाचे सावट:अनेक गावांतील शेतात कापलेला भात सडला.. बांदा : प्रतिनिधीसावंतवाडी तालुक्यात गेल्या सहा-सात दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाडलोस, रोणापाल, मडुरा, कास, निगुडे, सातोसे, न्हावेली, दांडेली, बांदा, शेर्ले, विलवडे, वाफोली आणि इन्सुली या भागातील शेतकऱ्यांच्या भातशेतीवर याचा गंभीर परिणाम झाला आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकतेच कापलेले भात शेतातच सडले…

Read Full News

अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती देण्याचे आवाहन…!

⚡सिंधुदुर्गनगरी,ता.२८-: जिल्ह्यात सद्यस्थितीत भात व नाचणी पिकाची कापणी चालू असून 21 ऑक्टोंबर पासून अवकाळी पाऊस पडत आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 136 गावांमध्ये 1 हजार 18 शेतकऱ्यांचे 196 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल तालुका कृषि अधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयास कळविला असून तो शासनास सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार प्राथमिक नुकसानीमध्ये…

Read Full News

सेवाभावी भारतीय संस्था, सावंतवाडी तर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा ९ नोव्हेंबर रोजी…

⚡सावंतवाडी ता.२७-: सेवाभावी भारतीय संस्था, सावंतवाडी यांच्या वतीने रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी एस. पी. के. कॉलेज, सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. ही स्पर्धा दोन गटांमध्ये होणार आहे.गट १: इयत्ता पाचवी ते सातवी (वेळ – ३ ते ४ मिनिटे)…

Read Full News

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमधील कंत्राटी भरतीत गोलमाल…?

राजाराम उर्फ आबा चिपकर:जिल्ह्यातील उमेदवारांवर अन्याय सुरूच राहिला तर मेडिकल कॉलेजसमोर ठाकरे सेना जनआक्रोश आंदोलन करणार… ⚡ओरोस ता.२८-: सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमधील कंत्राटी भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गोलमाल सुरू असल्याचे समोर आले आहे. शासनाकडून नियुक्त स्मार्ट कंपनीकडून उमेदवारांची अंतिम यादी कॉलेज प्रशासनाकडे सादर होऊन महिनाभर उलटला असतानाही जिल्ह्यातील उमेदवारांची कागदपत्र तपासणी अद्याप झालेली नाही. अशी माहिती…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्तक्षेपानंतर किल्ला पुन्हा खुला…

⚡मालवण ता.२८-:मालवण येथील राजकोट किल्ला सार्वजनिक बांधकाम विभागाने काल सायंकाळी अचानक बंद केला असता स्थानिक नागरिक बाबल नरोना, नागेश परब, भाई चिंदरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची भेट घेऊन पर्यटन हंगाम सुरु असल्याने किल्ला सुरु करण्याची मागणी केल्यावर काल सायंकाळी ६ वाजल्यापासून किल्ला पुन्हा सुरु करण्यात आला. तसेच याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही पालकमंत्री नितेश राणे यांचे…

Read Full News

सावंतवाडी तालुका भाजप अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्षपदी अब्दुल सुलेमान साठी यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.२८-: भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष निसार शेख यांच्या उपस्थितीत सावंतवाडी तालुका अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्षपदी अब्दुल सुलेमान साठी यांची संघटनात्मक नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा सरचिटणिस शहानवाज शहा, भाजपचे आदिल शेख, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष श्री. सुधीर आडिवरेकर, सावंतवाडी शहर सरचिटणीस श्री. दिलीप भालेकर, जेष्ठ भाजप कार्यकर्ते श्री. शाम केनेवडेकर,…

Read Full News

मी युवासेनासाठी प्रामाणिकपणे काम केले, पण दुर्लक्ष झाल्याने पक्षबदलाचा निर्णय घेतला…

रियाज खान:“मी युवासेनेत अधिकृत पदावर होतो किंवा नाही, हा मुद्दा गौण आहे.. ⚡बांदा ता.२८-: “मी आजवर युवासेनेत मनापासून आणि निष्ठेने काम केले. मात्र, माझ्या कार्याकडे कायम दुर्लक्ष झाले, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेत मी शिवसेनेत प्रवेश केला आहे,” अशी प्रतिक्रिया रियाज खान यांनी दिली आहे. अलीकडेच झालेल्या त्यांच्या पक्षबदलावर युवासेनेचे बांदा उपविभागप्रमुख ओंकार नाडकर्णी यांनी दिलेल्या…

Read Full News

You cannot copy content of this page