⚡बांदा ता.०९-: घारपी येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा सोहळा साजरा होणार आहे. त्यानिमित्त मठात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे पाच वाजता काकड आरती सकाळी दहा वाजता अभिषेक व नामस्मरण, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामीभक्त विजय गावकर यांनी केले आहे.
घारपी येथील श्री स्वामी समर्थ मठात उद्या गुरुपौर्णिमा सोहळा होणार साजरा…!
