मोती तलावात पडलेल्या व्यक्तीचे धाडसी युवकांकडून प्राणरक्षण…

सावंतवाडी : शहरात मोती तलाव काठावर एक अज्ञात व्यक्ती तलावात पडला. अजय पाटील असं त्या व्यक्तीच नाव असून येथील धाडसी युवकांनी आपला जीव धोक्यात घालून त्याचे प्राण वाचवले.

मोती तलाव जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान समोर हा प्रकार घडला. सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. तलाव काठावर झोपलेला असताना तोल जावून तो पाण्यात पडला. यावेळी येथून जाणाऱ्या धाडसी युवकांनी त्याचे प्राण वाचवले. प्रथमदर्शनी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. यावेळी बघ्यांनी देखील मोठी गर्दी केली होती. नशेत त्याचा तोल जावून तो पाण्यात पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

You cannot copy content of this page