⚡बांदा ता.०९-: बांदा लकरकोट येथील श्री दत्त मंदिरात गुरुवार दि. १०जुलै रोजी श्री गुरु पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त मंदिरात पहाटेपासून संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे.
पहाटे पाच वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी साडेसात वाजता श्री दत्त महाराजांची महापूजा, साडेआठ वाजता श्री दत्त महाराजांच्या सेवेत रुजू करण्यात येणाऱ्या प्रभावळीवर शुद्धीकरण अभिषेक, दुपारी एक वाजता महाआरती ,महानैवैद्य सामूहिक गाऱ्हाणे होईल. त्यानंतर
दुपारी दीड वाजता महाप्रसादास आरंभ होईल.
सायंकाळी पाच ते नऊ भजनांचा कार्यक्रम होईल .रात्री साडेदहा वाजता शेजारती होईल.
सर्व भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळ श्री दत्तप्रसाद कला क्रीडा मंडळ लकरकोट बांदा च्या वतीने अध्यक्ष सुशांत पांगम आणि उपाध्यक्ष शुभम साळगांवकर यांनी केले आहे.
फोटो –
श्री दत्त मंदिर बांदा लकरकोट