माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनीसहकुटुंब घेतले रेडी येथील श्री नवदुर्ग मातेचे दर्शन…!

⚡वेंगुर्ला ता.२९-:
तालुक्यातील रेडी – कनयाळ येथील श्री नवदुर्गा मंदिरात आज प्रसिद्ध क्रिकेटर सुनील गावस्कर व गुंडप्पा विश्वनाथ यांनी सहकुटुंब भेट देत देवीची पूजा केली. यावेळी आयोजित महाप्रसादाचाही त्यांनी लाभ घेतला. रेडी कनयाळ येथील नवदुर्गा माता ही गावस्कर कुटुंबियांची ग्रामदेवता आहे. या मंदिराला लागून सुनील गावस्कर यांनी स्वखर्चातून अन्नछत्र बांधकाम केले आहे. याचे उदघाटन आज सुनील गावस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. “जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळतो तेव्हा आपण आपल्या या ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी येऊन नतमस्तक होत असल्याचे यावेळी सुनील गावस्कर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page