महेश सारंग: पोलीस ठाण्यात तक्रार दाखल,कारवाईची केली मागणी..
⚡सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडी जिल्हा बँकेत माझ्या नावे व माझ्या कुटुंबियांचे नावे आजमितीपर्यंत कोणतेही कर्ज प्रकरण नसताना केवळ स्वरूपाचा तक्रारी अर्ज दाखल करत माझी बदनामी करणाऱ्या एका व्यक्तीचा शोध घेऊन त्याला पाठीशी घालणाऱ्या विविध विघ्न संतोषी शक्तीचा तपास व्हावा शिवाय त्याच्यावर बदनामी केल्याप्रकरणी फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात केली आहे.
दरम्यान काहींकडून माझ्या विरोधात पीडीएफ फाईल व्हाट्सअप वर प्रसारित करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामागे काही स्थानिक नेत्यांचा देखील हात असल्याचं त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांची देखील चौकशी करावी अशी मागणी देखील सारंग यांनी यावेळी केली.
