Headlines

गवाणकर व कदम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मालवणात ५ रोजी शोकसभा…

⚡मालवण ता.०१-:ज्येष्ठ नाटककार, मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर ओळख निर्माण करून देणारे, ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर व ज्येष्ठ दिग्दर्शक रघुनाथ कदम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अष्टपैलू कलानिकेतन, मालवणतर्फे दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. गंगाराम गवाणकर तथा नाना व रघुनाथ कदम यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीची…

Read Full News

वायरी भूतनाथ येथे ५ रोजी रंगभूमी दिन…

⚡मालवण ता.०१-:वायरी भूतनाथ येथील भूतनाथ नूतन नाट्य समाज या नाट्य मंडळातर्फे श्री. प्रदीप वेंगुर्लेकर यांच्या निवासस्थानी मराठी रंगभूमी दिन सोहळा दि. ५ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी सायंकाळी ७ वाजता नटराज मूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे. तरी नाट्यप्रेमींनी उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read Full News

कोळंब येथील गोपाळकृष्ण मंदिरात १७ रोजी गवळदेव उत्सव…

⚡मालवण ता.०१-:कोळंब भटवाडी येथील गोपाळकृष्ण मंदिरात गवळदेव उत्सव आणि आठवा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सोमवार दि. १७ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वाजता मूर्ती पूजा व अभिषेक, ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२ वाजता महाआरती, १ वाजता महाप्रसाद व तीर्थप्रसाद, ३ वाजता श्री चरणी ग्रामस्थांची गाऱ्हाणी,…

Read Full News

आचरा पिरावाडी येथील ज्येष्ठ नाट्य कलावंत जीजी सारंग यांचे निधन…

⚡मालवण ता.०१-:आचरा पिरावाडी येथील रहिवाशी व ज्येष्ठ नाट्य कलावंत श्री. काशिनाथ उर्फ जीजी अनाजी सारंग (वय ७८) यांचे आज शनिवारी पिरावाडीतील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. जीजी सारंग यांनी नाट्य, कला व गायन क्षेत्रात बहुमोल असे योगदान दिले. पिरावाडीमधील हौशी रंगभूमीवरील व सांस्कृतिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडीचे…

Read Full News

कोकणात पावसाने शेतकऱ्यांचं घामाचं सोनं वाहून नेलं..

बबन साळगावकर:शासनाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी व कर्जमाफी करावी.. ⚡सावंतवाडी, ता.१-:उसवलं गणगोत सारं — आधार कुणाचा नाही, अशी वेळ कोकणातील शेतकऱ्यांवर आली आहे. अवकाळी आणि सतत पडत असलेल्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.शासनाने या परिस्थितीची तातडीने दखल घ्यावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी आणि त्यांच्या कर्जाची माफी करावी, अशी मागणी शेतकरी…

Read Full News

डेगवे-तांबोळी मार्गावरील फॉरेस्ट रस्ता झाला खड्डेमय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास…

⚡बांदा ता.०१-: डेगवे–तांबोळी मार्गावर वन खात्याच्या मालकीतील रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. अवघ्या 280 मीटर अंतराच्या या फॉरेस्ट रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने तांबोळी, असनीये, घारपी, फूकेरी, झोळंबे, भालावल, कोनशी, नांगरतास, दाभील या गावातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.हा रस्ता विद्यार्थ्यांसाठी आणि ग्रामस्थांसाठी सर्वात…

Read Full News

बांद्यात १५ नोव्हेंबरला नट वाचनालयात बालवाचक कथाकथन स्पर्धा…

⚡बांदा ता.०१-: शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून येथील नट वाचनालयाच्या वतीने विष्णु गावकर, आडाळी पुरस्कृत (त्यांची पत्नी कै. सौ. विजयालक्ष्मी विष्णु गांवकर व सुपुत्र कै. श्री. बिपीन विष्णु गांवकर यांचे स्मरणार्थ) बालवाचक कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा शनिवार दिनांक १५ नाव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नट वाचनालय, बांदा च्या नाडकर्णी सभागृहात…

Read Full News

गावराई गडकरी वाडीतील उभाठा कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत…

सिंधुदुर्गनगरी ता १कुडाळ तालुक्यातील गावराई गडकरवाड़ी येथील उध्दव ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यानी शुक्रवारी शिंदे सेनेत प्रवेश करत ठाकरे सेनेला धक्का दिला. कुडाळ तालुक्यातील गावराई गड़करवाडी येथील कार्यकर्ते गेली अनेक वर्षे ठाकरे सेनेसोबत होते . मात्र ठाकरे सेनेचे गेली १०वर्षे आमदार, खासदार असूनही त्यांनी या कार्यकर्त्यांच्या मागणीकड़े दुर्लक्ष केले , येथील पाणी सुविधा, रस्ते , गणेश घाट…

Read Full News

कोलगाव येथे चालकाची दुचाकीला धडक,महिलेला गंभीर दुखापत…

सावंतवाडी : कोलगाव येथे एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील महिलेला गंभीर दुखापत झाली. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. येथून प्रवास करणारे सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ वकील ॲड.‌ बापु गव्हाणकर यांनी जखमींना मदत केली. आपल्या कारन त्यांनी जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दारूच्या नशेत चालकाकडून हा प्रकार घडला. संतप्त स्थानिकांनी…

Read Full News

दुबार-बोगस मतदारांनवर कणकवलीचा नगराध्यक्ष ठरतो की काय…?

कणकवली शहरात 1000 पेक्षा जास्त दुबार मतदार-सुशांत नाईक यांचा आरोप:युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी तहसीलदार यांचे वेधले लक्ष.. ⚡कणकवली ता.०१-: काही दिवसापूर्वी कणकवली शहरात व ग्रामीण भागात 200 दुबार मतदार असल्याबाबतची तक्रार युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कणकवली नगरपंचायत च्या मुख्याधिकारी यांच्याजवळ दिली होती. कणकवली शहरात 200 दुबार मतदार असल्या बाबतची यादी आम्ही काढली पण…

Read Full News

You cannot copy content of this page