⚡मालवण ता.०१-:
कोळंब भटवाडी येथील गोपाळकृष्ण मंदिरात गवळदेव उत्सव आणि आठवा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सोमवार दि. १७ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी ८.३० वाजता मूर्ती पूजा व अभिषेक, ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२ वाजता महाआरती, १ वाजता महाप्रसाद व तीर्थप्रसाद, ३ वाजता श्री चरणी ग्रामस्थांची गाऱ्हाणी, सायंकाळी ७ वाजता स्थानिक भजने, रात्री ९.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम-रेकॉर्ड डान्स व एकांकिका सादर होणार आहे. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गोपाळकृष्ण मंडळ, कोळंब भटवाडी यांनी केले आहे.
