⚡बांदा ता.०१-: शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून येथील नट वाचनालयाच्या वतीने विष्णु गावकर, आडाळी पुरस्कृत (त्यांची पत्नी कै. सौ. विजयालक्ष्मी विष्णु गांवकर व सुपुत्र कै. श्री. बिपीन विष्णु गांवकर यांचे स्मरणार्थ) बालवाचक कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा शनिवार दिनांक १५ नाव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नट वाचनालय, बांदा च्या नाडकर्णी सभागृहात होणार आहे.
ही स्पर्धा सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित असून इयत्ता तिसरी ते चौथी आणि इयत्ता पाचवी ते सातवी अशा दोन शालेय गटात होणार आहे. लहान गटासाठी “शौर्यकथा” हा विषय असून वेळ चार मिनीटे आहे. मोठ्या गटासाठी “संतांच्या जीवनातील प्रसंग” हा विषय असून वेळ पाच मिनीटे आहे. दोन्ही गटातील पहिल्या तीन क्रमांकाना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेसाठी एका गटात एका शाळेतील फक्त दोनच विद्यार्थी सहभागी होतील. तरी या सभेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांची नावे संबंधित शाळांनी दिनांक १२ नाव्हेंबर पर्यंत नट वाचनालयात आणून द्यावीत, व ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन नट वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी या ९४०५५७०३४९ क्रमांकावर संपर्क साधावा.
बांद्यात १५ नोव्हेंबरला नट वाचनालयात बालवाचक कथाकथन स्पर्धा…
