कोकणात पावसाने शेतकऱ्यांचं घामाचं सोनं वाहून नेलं..

बबन साळगावकर:शासनाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी व कर्जमाफी करावी..

⚡सावंतवाडी, ता.१-:
उसवलं गणगोत सारं — आधार कुणाचा नाही, अशी वेळ कोकणातील शेतकऱ्यांवर आली आहे. अवकाळी आणि सतत पडत असलेल्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.शासनाने या परिस्थितीची तातडीने दखल घ्यावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी आणि त्यांच्या कर्जाची माफी करावी, अशी मागणी शेतकरी बांधव बबन साळगावकर यांनी केली आहे.

सध्या भात शेतीला कोब आलेले आहेत; परंतु मुसळधार पावसाने शेतं चिखलमय झाली आहेत. पिकं पाण्यात बुडाल्यामुळे भात उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकरी अंगाला चिखल लावून दिवसरात्र शेतात काम करतो, पण शेतकऱ्यांच घामाचं सोनं पावसाने वाहून गेलं. पिकलेलं पाऊस खायलाही देत नाही. शासन बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील साळगावकर यांनी केली.

You cannot copy content of this page