अँड. दिलीप नार्वेकर:तालुका काँग्रेस आघाडीसाठी प्रयत्नशील झाली नाही, तर आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवू; महेंद्र सांगेलकर..
⚡सावंतवाडी, ता.३१-: सावंतवाडी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी करावी, असे आवाहन काँग्रेस नेते व माजी नगराध्यक्ष अँड.दिलीप नार्वेकर यांनी केले.ते सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत बोलत होते.
यावेळी श्री. सांगेलकर म्हणाले, “महाविकास आघाडी संदर्भात अद्याप चर्चा झालेली नाही. तालुका काँग्रेस आघाडीसाठी प्रयत्नशील आहे. मात्र आघाडी झाली नाही, तर आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवू.”
बैठकीत ठरविण्यात आले की, शहरातील प्रत्येक वार्डनिहाय बैठकांचे आयोजन करून इच्छुक उमेदवारांचे नगरसेवक तसेच नगराध्यक्ष पदाचे अर्ज शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट राघवेंद्र नार्वेकर यांच्याकडे जमा करण्यात येतील. हे अर्ज पक्ष निरीक्षकांच्या माध्यमातून येत्या दहा दिवसांत जिल्हा काँग्रेस कमिटी व प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठविण्यात येतील.
यावेळी कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या की, पक्षासाठी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
बैठकीस काँग्रेसचे प्रांतिक सदस्य व माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री. महेंद्र सांगेलकर, शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष बासिप पडवेकर, जास्मिन लक्षमेश्वर, उपाध्यक्ष शिवा गावडे, अरुण नाईक, सरचिटणीस रुपेश अहिर, संजय राऊळ, ओबीसी शहराध्यक्ष संतोष मडगावकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सौ. सुमेधा सावंत, माया चिटणीस, स्मिता टिळवे, निषाद बुरान, जहिरा खान, बाळा नमशी, ज्ञानेश्वर पारधी, प्रतीक्षा भिसे, अरुण भिसे, विल्यम सालदाना, ग्रेगरी डान्टस, लक्ष्मण भुते, विनायक नमशी, श्याम सावंत, किशोर राणे, रफिक नाईक, समीर वंजारी, शुभू नाईक, समीर भाट, गणपत मांजरेकर, आनंद कुंभार, मिनिन गोम्स, विनोद मल्हार, शरद गावडे, बबन डिसोजा, दीपक कदम, सत्यवान शेडगे, मिलिंद सुकी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
