Headlines

श्रद्धेची अखंड परंपरा जपणारा श्री देव दोन गावचा पूर्वस जत्रोत्सव उत्साहात साजरा…

सावंतवाडी : मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावच्या श्रद्धेची अखंड परंपरा जपणारा मळगाव येथील जागृत दैवत श्री देव दोन गावचा पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या लक्षणीय गर्दीत भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणेच श्री देव दोन गावचा पूर्वस हे मळगाव व सोनुर्ली या दोन्ही गावांचे आराध्य दैवत आहे….

Read Full News

ॲड राजीव बिले यांना कोकणरत्न पदवी प्रदान…

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे प्रख्यात वकील ॲड राजीव दत्ताराम बिले यांना स्वतंत्र कोकणराज्य अभियानांतर्गत कोकणरत्न पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. हा पदवीप्रदान सोहळा मुंबई येथील आझाद मैदान मराठी पत्रकार भवन येथे संपन्न झाला.यावेळी स्वतंत्र कोकणराज्य अभियानचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे, वरिष्ठ पत्रकार व संपादक सचिन कळझुनकर, मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर,युवानेते सचिन गावडे, खजिनदार राजेंद्र…

Read Full News

कणकवलीत युवती मृत्यू प्रकरणी परस्पर गुन्हे दाखल…?

50 पेक्षा जास्त लोकांवर झाले गुन्हा दाखल:गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून कमालीची गुप्तता.. ⚡कणकवली ता.१५-: तालुक्यातील युवतीच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने खासगी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करत रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी मृत युवतीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन डॉक्टरांवर, तर रुग्णालयाचे संचालक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ४० ते ५० जणांविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटेच्या…

Read Full News

कुणकेरी बुथ क्र. १०० च्या अध्यक्षपदी रघुनाथ गावडे यांची निवड…

महेश सारंग यांच्याकडून अभिनंदन: कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग.. ⚡सावंतवाडी ता.१४-: जि प मतदारसंघ कोलगाव कुणकेरी बुथ क्रमांक १०० च्या बुथ अध्यक्ष पदी रघुनाथ शिवराम गावडे यांची निवड करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस महेशजी सारंग यांनी अभिनंदन केले . यावेळी माजी सभापती प्रमोद सावंत .उपसरपंच सुनील परब . गामपचायंत सदस्य भगवान सावंत कृष्णा मेस्त्री…

Read Full News

चैतन्य शिंदे व अहुजा उगले ठरले वेगवान जलतरणपटू…

मालवणात राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा संपन्न.. ⚡मालवण ता.१४-:महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने व जिल्हा जलतरण संघटनेच्यावतीने मालवण चिवला बीच येथे आयोजित १५ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी पाच किलोमीटर अंतर स्पर्धेत वेगवान जलतरणपटू म्हणून मुलांच्या गटात चैतन्य शिंदे (पुणे) आणि मुलींच्या गटात अहुजा उगले (नाशिक) तर तीन किलोमीटर अंतर स्पर्धेत वेगवान जलतरणपटू…

Read Full News

वकिलांनी एथिक्स आणि पेशन्स ठेवून काम करावे…

न्या. कर्णिक:भूमिपुत्र न्यामुर्तींचा जिल्हा बार असोसिएशनतर्फे सत्कार.. ⚡कुडाळ ता.१४-: मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आज हा अतिशय सुंदर सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सर्किट बेंचचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नवीन वकिल येत असतात. सिंधुदुर्गासह सहाही जिल्ह्यातील वकिलांचे काम चांगले आहे. त्यामुळे निश्चितच या सहाही जिल्ह्यातून…

Read Full News

वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे निसर्ग निवास शिबिर संपन्न…

⚡मालवण ता.१४-:वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचे निसर्ग निवास शिबिर मालवण तालुक्यातील कुणकवळे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे संपन्न झाले. या शिबिरास माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशालेतील विद्यार्थी, स्काऊट गाईड शिक्षक,मुख्याध्यापक व संस्थाचालक यांचे हा उपक्रम राबवल्याबद्दल कौतुक केले. तसेच जीवनात येणाऱ्या समस्यांवर…

Read Full News

आरोंदा भटपावणी येथे वाघाचे दर्शन…?

वाघाच्या दर्शनाने गावात भीतीचे वातावरण:वनविभागाने लवकरात लवकर या वाघाचा बंदोबस्त करावा;उपसरपंच गोविंद केरकर.. ⚡सावंतवाडी ता.१४-: आरोंदा भटपावणी येथे शनिवारी रात्री १०.३० वाजता दुचाकीने घरी जाताना येथील युवकाला अगदी जवळून दोन बच्छड्यांसह वाघाचे दर्शन झाले. आरोंदा रेडी मुख्य रस्त्या जवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळे नजीक सदर वाघ रस्ता ओलांडत असल्याचे निदर्शनास आले.भटपावणी येथील साईल विद्याधर नाईक…

Read Full News

ब्युटीशियन सौ. सायली मांजरेकर यांची कोकण रत्न पदवी पुरस्कार प्रदान…

⚡मालवण ता.१४-:मालवण मधील ब्युटी पार्लर व्यवसायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. सायली सलील मांजरेकर यांना स्वतंत्र कोकणराज्य अभियाना तर्फे मुंबई येथे कोकण रत्न पदवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सौ. सायली मांजरेकर या गेली अनेक वर्षे मालवणात ब्युटीशियन म्हणून कार्यरत असून सायली ब्युटीपार्लरच्या माध्यमातून त्या शासनमान्य ब्युटीशियन कोर्स देखील घेत असून आजपर्यंत त्यांनी अनेक युवती व महिलांना…

Read Full News

देव्या सूर्याजी यांच्या पुढाकारामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील पाणीटंचाईचा प्रश्न अखेर मार्गी…

⚡ सावंतवाडी ता.१४-:युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्या पुढाकारामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील दीर्घकालीन पाणीटंचाईचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. स्थानिक आमदार विकास निधीतून मंजूर झालेल्या विंधन विहिरीच्या कामाचा शुभारंभ आज उपजिल्हा रुग्णालय परिसरात करण्यात आला. मार्च, एप्रिल व मे या उन्हाळी महिन्यांत रुग्णालयात तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना तसेच रुग्णालय कर्मचाऱ्यांनाही…

Read Full News

You cannot copy content of this page