मालवणात उद्या वीर परिवार सहायता योजना माहिती सत्र…

⚡मालवण ता.०१-:
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणमार्फत वीर परिवार सहायता योजना २०२५ अंतर्गत संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांना कायदेविषयक बाबींमध्ये मोफत व सक्षम कायदेशीर सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच योजनेबाबत माहिती व मार्गदर्शन देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग व तालुका विधी सेवा समिती, मालवण यांच्यावतीने, ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता दिवाणी न्यायालय, मालवण येथे माहिती सत्राचे आयोजन केले आले आहे.

या सत्रामध्ये संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना कायदेशीर हक्क, मोफत कायदेशीर सेवा, विविध योजना व सहाय्य सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मालवण तालुक्यातील संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक व त्यांच्यावर अवलंबित कुटुंबियांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभघ्यावा. अधिक माहितीसाठी ९४०३३६८७५१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page