संजू परब यांचा उबाठाला मोठा धक्का…

आंबोलीतील उबाठा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश..

⚡ आंबोली ता.०१-:
शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला आंबोली परिसरात मोठे बळ मिळाले असून उबाठा गटाला जोरदार धक्का बसला आहे.

आंबोली जिल्हा परिषद गटातील उबाठा पक्षाचे उपविभाग प्रमुख बुधाजी पाताडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश पक्ष निरीक्षक राजेश मोरे यांच्या हस्ते व शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश पावसकर, निधी गुरव, राजा गुरव, रामचंद्र आमडोस्कर, निखिल गुरव, जी. जी. राऊत, गोविंद जाधव, संजय राऊत, सुनील राऊत, शोभना राऊत, रिया पाताडे, संजय पडते, बाबुराव शेळके, लक्ष्मण जाधव, कांता गुरव, अनिल मेस्त्री, केशव जाधव आदी उबाठा पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सांगितले की, शिवसेनेची विचारधारा, सर्वसामान्यांसाठीची लढाई आणि विकासाभिमुख धोरणामुळे अनेक कार्यकर्ते पक्षात येत आहेत. येत्या काळात आंबोली जिल्हा परिषद गटात शिवसेना अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासमवेत पक्ष निरीक्षक राजेश मोरे, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, पंचायत समितीचे उमेदवार मायकल डिसोजा, विभागप्रमुख विलास गावडे, माजी सरपंच जगन्नाथ गावडे, अरुण गावडे, नंदू गावडे, विशाल बांदेकर, उत्तम नार्वेकर आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page