Headlines

बेळगावीचे प्रथमेश परमकर आणि आरती शहा कुडाळ मॅरेथॉनचे विजेते…

१६ किमी मध्ये मुंबईचा निलेश आर्डेकर आणि गडहिंग्लजची ममता पाटील प्रथम:आंतरराष्ट्रिय धावपटू विल्सन किपराॅप याची विशेष उपस्थिती प्रेरणादायी – जिल्हाधिकारी

कुडाळ : राणे हाॅस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ आयोजित कुडाळ मान्सून रनच्या तिसऱ्या पर्वात २१ किमी पुरूष गटात बेळगावी-कर्नाटकचा प्रथमेश करमरकर आणि महिला गटात बेळगावीची आरती शहा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. १६ किमी मध्ये पुरुषांच्या गटात मुंबईच्या निलेश आर्डेकर याने तर महिला गटात गडहिंग्लजच्या ममता पाटील यांनी पहिलं साठां पटकावलं. 10 किमी मध्ये पुरुषांच्या गटात कोल्हापूरचा तेजस सोनवणे तर महिला गटात धारवाड कर्नाटकची विजयालक्ष्मी विजेते झाले. केनियाचा आंतरराष्ट्रिय धावपटू विल्सन केपराॅप यांची विशेष ऊपस्थिती आणि त्यांनी प्रत्यक्ष मॅरेथॉन मध्ये घेतलेला सहभाग प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन, कुडाळ सायकल क्लब, रांगणा रनर्स, रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या ‘कुडाळ मॉन्सून रन २०२६’ या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्या तिसऱ्या वर्षी तब्बल दोन हजारांहून अधिक धावपटूंनी विविध गटांत सहभाग नोंदवत स्पर्धा यशस्वी केली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ मोहन दहिकर, अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक नयोमी साटम, जिल्हा परिवहन अधिकारी काळे, राणे हाॅस्पिटलचे डाॅ जी टी राणे, डाॅ सई राणे, अजित राणे, सौ मिलन राणे, बॅ नाथ पै चे उमेश गाळवणकर, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष रणजित राणे, सचिव सौ. कल्पना तेंडोलकर, बाळा कदम, टीम केएमआचे गजानन कांदळगावकर, रूपेश तेली, शिवप्रसाद राणे, अमित तेंडोलकर, राज वारंग, शक्ति देसाई, डाॅ प्रशांत मडव, डाॅ प्रशांत सामंत, डाॅ जयसिंग रावराणे, सौ अमृता गाळवणकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अमित सामंत, केदार सामंत, रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष मकरंद नाईक, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, ॲड नकुल पार्सेकर, सावंतवाडी डिवायएसपी श्री. भागवत साहेब ,नगरसेविका सौ संध्या तेर्से, ओंकार तेली, विनायक राणे, निलेश परब, बंड्या सावंत,
डाॅ स्नेहल गोवेकर, डाॅ रोहन कोरगावकर, डाॅ सोमनाथ परब, डाॅ मिलिंद बोर्डवेकर, डाॅ गिरिष बोर्डवेकर, डाॅ अनघा बोर्डवेकर आदी पेसरचा यावेळी सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. तसेच डाॅ शन्तनू तेंडुलकर, डाॅ उमेश सावंत, डाॅ प्रसाद कोरगावकर, डाॅ अंजना काजरेकर, डाॅ सुप्रिया मडव, डाॅ सोनल पालव,डाॅ शुभांगी जोशी,डाॅ प्रल्हाद मणचेकर,डाॅ प्रफुल्ल आंबेरकर,डाॅ तेजानंद गणपत्ये ,डाॅ अरविंद सावंत,डाॅ शिवम घोगळे,शिल्पा दाते काळे,डाॅ नितीन संगर, डाॅ तेजस मुणगेकर, डाॅ धनंजय पाध्ये, डाॅ स्वप्निल दाभोलकर, डाॅ मिलिंद खानविलकर, डाॅ ओमकार पराडकर, डाॅ जयंत शिवदे, डाॅ आशिष पावसकर, प्रकाश चव्हाण, प्रमोद भोगटे, राॅबर्ट वज, रूचिरा सापळे आंदिचा सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
४१ विविध आंतरराष्ट्रीय मॅराॅथाॅन विजेता धावपटू केनियाचा विल्सन केपराॅप याची कुडाळ मान्सून मॅराॅथाॅन 3-या पर्वात विशेष उपस्थितीमुळे अनेक धावपटूंना प्रेरणा मिळाली. यानिमित्त राणे हाॅस्पिटल आणि रिसर्च सेंटरकडून जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे हस्ते विशेष सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
कुडाळ मान्सून मॅराॅथाॅन तिसऱ्या पर्वात सर्व सहभागी धावपटूंसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आईमाऊली महिला ढोलपथक चेंदवण व सिध्दिविनायक ढोलपथक नेरूर, श्री कलेश्वर विद्यामंदीर नेरूर व चिमणी पाखर डान्स ॲकाडमी कुडाळ या कलाकारांचे वारकरी पथक विशेष लक्ष देवून गेले. श्री विठ्ठल, महागणपती, स्वामी समर्थ वेशभूषेत बालकलाकार उपस्थित होते.
मुळदे कृषिमहाविद्यालयाचे एन सी सी छात्रसेना सेवक व सिंधुदुर्ग एमआर टीम मॅराथाॅनच्या रस्त्यावर स्वयंसेवक म्हणून योगदान दिले. या मॅराॅथाॅनमध्ये एकूण दोन हजारच्यावर धावपटूंनी विक्रमी नोंदणी केली. यामध्ये गोवा, रत्नागिरी, मुंबई , कोल्हापूर, कर्नाटक, सिंधुदुर्ग आदी भागातून उत्फूर्त सहभाग नोंदवला. निवेदन सचिन मदने आणि मुंबईंच्या प्रिती मार्कडेय यांनी केले.
१० किमी ची यशस्वी रन करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ मोहन दहिकर, अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक नयोमी साटम, सौ अमृता गाळवणकर आदींचे विशेष सन्मान करण्यात आले. मॅरेथॉनमध्ये माजी आमदार वैभव नाईक देखील सहभागी झाले होते.
सुक्ष्म व उत्कृष्ट नियोजनामुळे कुडाळ मान्सून मॅराॅथाॅन तिसऱ्या पर्वात धापटूंचे उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व धावपटूंची वेळ नोंदवणारी मुंबई पुण्याची अल्फा टीमची विशेष उपस्थिती होती. या निमित्ताने हाॅटेल व्यवसायिक, रिक्षाधारक, लाॅजिंग व्यवसायास चालना मिळाली. पर्यटनासाठी अत्यंत उपयुक्त अशी निरोगी आरोग्याचा सामाजिक संदेश देणारी कुडाळ मान्सून मॅराॅथाॅन यशस्वी झाल्याचे प्रतिपादन डाॅ जी टी राणे व अजित राणे यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page