PI निसर्ग ओतारी आणि टीमची अवैध धंद्यावर करडी नजर….
वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यात वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्याचा चार्ज घेतल्यापासून अतिशय चांगले काम केले आहे. त्यांच्यासह अन्य अधिकारी व सर्वच अंमलदार, महिला पोलीस यांनी विविध गुन्ह्यात जलदगतीने तपास करीत अनेक गुन्हेगारांना जलदगतीने ताब्यात घेत पुढील कार्यवाही केली आहे. त्यामुळे वेंगुर्ला तालुक्यासह जिल्हाभरातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
वेंगुर्ला तालुक्यात मागील वर्षभरात बहुसंख्य घटना घडल्या आहेत. वेंगुर्ला शहरात कॅम्प परिसरात दागिने लांबविणाऱ्या गुन्हेगारास शिताफिने ताब्यात घेतले आहे . परजिल्ह्यातील हिंदू युवतीस फूस लावून वेंगुर्ला येथे बराच कालावधी वास्तव्य केलेल्या एका मुस्लिम युवकास शिताफीने ताब्यात घेत पुढील कार्यवाही केली आहे. वेंगुर्ला शहरातील एका काजू उद्योजकाची सुमारे ९.९० लाखाची फसवणूक प्रकरणी दोन “भामट्या” महिलांना व एका पुरुषाला ताब्यात घेत सुमारे दोन लाखाची वसुली करण्यात आली आहे. अनेक मोटारसायकल चोरी करणाऱ्या युवकांना दुचाकीसह ताब्यात घेतले आहे. दरम्यान गेल्या वर्षभरात तालुक्यात इतर अनेक घटना घडल्या असून त्याबाबत तपास सुरु आहे. मठ कुडाळतीठा येथे असलेल्या (बेळगाव येथील) सलून व्यासायिकाला चक्क पाच लाख रुपयांना लुबाडण्याचा प्रकार नोंद असून तपास सुरु आहे.
धाकोरे येथे ग्रामस्थांनी पाठलाग केल्यानंतर २५ किलो गोमांस टाकून पळालेल्या सावंतवाडी येथील संशयित इसमास सावंतवाडी व वेंगुर्ला पोलिसांनी
जेरबंद करीत ” कौतुकास्पद ” कामगिरी केली आहे.
तुळस येथे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वाहनातून गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या अन्य तालुक्यातील दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शिरोडा गंभीर मारहाण प्रकरणी दोन संशयिताना अन्य तालुक्यातून ताब्यात घेत कारवाई केली आहे. तसेच इतर गुन्ह्याबाबत पोलिसांचा शीघ्रगतीने तपास सुरु आहे. वेंगुर्ला पोलिसांमार्फत तालुक्यात व शहरात मटका, अवैध गुटखा व दारू विक्रीविरोधात कारवाई सुरूच आहे. तालुक्यात सागरी सुरक्षा कवच मोहीम, रेझिंग डे सप्ताह, रूटमार्च आदी मोहीम प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. गेल्या महिन्याभर तालुक्यात ग्रामीण स्तरावर अमली पदार्थ जागरूकता मोहीम राबवून जिल्ह्यात आदर्शवत कार्य केले आहे. वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व टीम यांच्यामार्फत सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कायम समुद्रकिनारी पेट्रोलिंग मोहीम राबविण्यात आली आहे.
वेंगुर्ला पोलीस टीम तालुक्यात व सीमानजिक कार्यक्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. “राष्ट्रपती पदक पुरस्कारप्राप्त” जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी चांगले काम करीत आहेत. वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड, पोलीस हवालदार योगेश सराफदार, योगेश राऊळ, मनोज परुळेकर, जयेश सरमळकर, योगेश मांजरेकर, भगवान चव्हाण, तसेच
संध्या गुरव, प्रज्ञा मराठे आदी टीमद्वारे शहरासह वेंगुर्ला तालुक्यात दारू, मटका यावर धरपकड मोहीम जोरदाररित्या राबविण्यात येत आहे. दरम्यान आज युवावर्ग भरकटत चालला असल्याने पालकांनी आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष पुरवावे. तसेच आपल्या एरियातील संबंधित व्यवसाय याबाबत पोलिसांना माहिती द्यावी. संबंधित व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन वेंगुर्ला पोलीस स्थानकातर्फे करण्यात आले आहे. वेंगुर्ला पोलिसांनी गेल्या कालावधीत दारू विक्री व दारू वाहतुकीवरही धडक कारवाई केल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान कोरोना कालावधीत सेवेद्वारे “उत्कृष्ट कामगिरी” करणाऱ्या येथील पोलीस अंमलदार मनोज परुळेकर व इतर पोलिसांमार्फत आणखी चांगले काम व्हावे,अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान आज रविवारी या वेंगुर्ला पोलीस टीमने संपूर्ण तालुक्यात दारू विक्री विरोधात धरपकड मोहीम राबविल्याने संबंधित दारू विक्रेते, छोटे मोठे व्यावसायिक यांचे धाबे दणाणले आहेत.
