Headlines

“वेंगुर्ले तालुक्यात ७० ठिकाणी वनराई बंधारे…

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकाराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग;म्हापण-चव्हाणवाडीत बंधारा उभारला..

⚡वेंगुर्ले, ता. २५-: पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासह भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने भाजपा युवा नेते विशाल परब व भाजपा सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने वेंगुर्ले तालुक्यात तब्बल ७० ठिकाणी वनराई बंधारे उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमाला विविध गावांतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ उभी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच उपक्रमांतर्गत म्हापण-चव्हाणवाडी येथे वनराई बंधारा उभारण्यात आला. ग्रामस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेत या कामात सहभाग नोंदविला. पावसाचे पाणी अडविणे, स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि भूजलपातळी वाढण्यास मदत करणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. या बंधाऱ्याची भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई यांनी पाहणी केली. ग्रामस्थांनी एकजुटीने जलसंधारणाच्या कामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. गावाच्या विकासासाठी लोकसहभागातून होणारी कामे अधिक परिणामकारक ठरतात, असे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपा शक्तिकेंद्रप्रमुख नाथा मडवळ, अनुसूचित जाती मोर्चाचे गुरुप्रसाद चव्हाण, साई श्रद्धा अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांच्यासह बाळकृष्ण चव्हाण, उमेश कोरगांवकर, महेश दाभोलकर, संदीप दाभोलकर, अर्जुन चव्हाण, बुधाजी चव्हाण, नंदिनी चव्हाण, आशिकी चव्हाण, जानकी चव्हाण, मिलिंद चव्हाण, लीलाधर चव्हाण, मनीष चव्हाण, शुभम चव्हाण, राजन गडकरी, राकेश चव्हाण, मंथन चव्हाण, यश चव्हाण, आनंद चव्हाण, मंदार चव्हाण, श्रेयस चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. वेंगुर्ले तालुक्यातील ७० ठिकाणी वनराई बंधारे उभारण्याच्या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर पाणी अडविणे व जिरविण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार आहे. कोकणात पावसाचे प्रमाण मोठे असले तरी पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी त्याचे योग्य नियोजन करून साठवण व पुनर्भरण करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे वनराई बंधाऱ्यांसोबत त्यांची नियमित देखभाल आणि स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन करण्यावरही भर देणे आवश्यक आहे. लोकसहभागातून जलसंधारणाला बळ पाणीटंचाईचा प्रश्न केवळ शासनाच्या योजनांपुरता मर्यादित न ठेवता गावागावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे उभी राहणे गरजेचे आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा आणि प्रत्येक थेंबाचे संवर्धन करा, हा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे. वेंगुर्ले तालुक्यातील ७० ठिकाणी राबविण्यात येणारा हा उपक्रम भविष्यातील जलसुरक्षेच्या दृष्टीने कितपत परिणामकारक ठरतो, हे प्रत्यक्ष पाणी साठवण व भूजलपातळीतील वाढीतून स्पष्ट होणार आहे.”

You cannot copy content of this page