मोहिनी मडगावकर यांची मागणी:
माजी खासदार विनायक राऊत, गीतेश राऊत व कुटुंबीयांवर कारवाईची पालकमंत्री नितेश राणे व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी करणार .
⚡सावंतवाडी ता.१२-:
गिरिजा राऊत यांच्यावर झालेले अत्याचार अत्यंत गंभीर असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपां महिला मोर्चा आघाडी त्यांच्या पाठीशी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व माजी खासदार विनायक राऊत, गीतेश राऊत आणि कुटुंबियांवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी पालकमंत्री नितेश राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली जाईल, महिलांवर होणारे अन्याय अत्याचार खपवून घेतले जाणार नाही असा इशारा आयोजित पत्रकार परिषदेत सावंतवाडी भाजपा महिला मोर्चा आघाडी शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी दिला.
सावंतवाडी भाजपा महिला मोर्चा तर्फे शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या माजी खासदार विनायक राऊत हे या जिल्ह्याचे दोन वेळा खासदार राहिलेले आहेत त्यांच्याच घरात स्वतःच्या सूनेवर अन्याय अत्याचार होत आहेत. हे प्रकार अत्यंत निंदनीय आहेत. या काळात एका राजकीय पक्षाच्या घरातच जर असे अत्याचार होत असतील तर योग्य नाही गिरिजा राऊत यांचा,पती व माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांनी सातत्याने छळ करणे, केस कापणे, गोमूत्र पिण्यास देणे, अघोरी कृत्य करण्यास भाग पाडणे असे अनेक प्रकार केले आहेत. हे चुकीचे आहे. आमचे सरकार महिलांवर अत्याचार झाल्यास गप्प बसणार नाही तर त्यांना कडक शासन करणारे आहे. आम्ही महिला या प्रकरणी शांत बसणार नाही. गिरिजा राऊत यांच्यासाठी कोणीही पुढे आले नाही किंवा आवाज उठवला नाही. उबाठा शिवसेनेच्या महिला प्रत्येक गोष्टींसाठी पुढे येतात आवाज उठवतात मग माजी खासदार याच्याच घरात जर एका महिलेवर अत्याचार, अमानुष छळ होत असेल तर त्या गप्प का,त्यांचा पक्ष आता कुठे आहे असा सवाल मडगावकर यांनी केला. महिलांवर अत्याचार होत असतील तर सर्व महिलांनी त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे होते. विनायक राऊत हे दोन वेळा या भागाचे खासदार राहिले आहेत त्यांच्याच घरात जर असे प्रकार होत असतील तर आम्ही भाजपा महिला मोर्चा तर्फे या घटनेचा निषेध करतो. गिरिजा राऊत यांच्यावरील मानसिक व शारीरिक छळा बाबत सर्व पक्षातील महिलांनी, सामाजिक संस्थानी एकत्र आले पाहिजे आवाज उठवला पाहिजे त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन केले. ह्यूमन राईट्स या संस्थेतर्फे व पक्षातर्फे आम्ही त्यांचीं भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवू.
गिरिजा राऊत यांच्यावरील अत्याचार प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि माजी खासदार विनायक राऊत, मुलगा गीतेश राऊत आणि कुटुंबीयांवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी पालकमंत्री नितेश राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे भाजप महिला मोर्चा तर्फे करणार असल्याचे मडगावकर यांनी सांगितले. विनायक राऊत आणि मुलाचा भाजपा महिला मोर्चा तर्फे निषेध आहे. ही अत्यंत घाणेरडी कृती आहे. प्रत्येक महिलेने गिरिजा राऊत यांच्या पाठीशी रहावे. आम्ही पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन देणार असून राऊत कुटुंबीयांवर योग्य ती कारवाईची मागणी केली जाईल असे यावेळी शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी सांगितले. अशा प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी समाजासाठी योग्य नाहीत त्याच्याच घरात जर असे प्रकार होत असतील तर समाजात काय संदेश जाणार त्यामुळे भाजपा महिला मोर्चा या घटनेचा निषेध करते.
या प्रकरणात गिरिजा राऊत यांच्या पाठीशी भाजप पक्ष कायम राहील त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही तर कोणत्याही परिस्थितीत महिलांवरील अत्याचार खपवून घेणार नाही असा इशारा भाजपा महिला मोर्चा आघाडी शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी पदाधिकारी मेघना साळगावकर, ज्योती मुद्राळे, साक्षी गवस, मेधा भोगटे उपस्थित होत्या.
