Headlines

स्वा. सावरकरांची ‘मार्सेलीस उडी’ गुलामगिरीच्या बेड्या झुगारून देणारी ऐतिहासिक झेप…

ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित:मसुरे येथील बागवे हायस्कूलमध्ये ‘मार्सेलीस पराक्रम दिन’ उत्साहात साजरा..

⚡मालवण ता.१२-:
ब्रिटीश साम्राज्याचा सूर्य ज्यांच्या राज्यावर कधी मावळत नव्हता, त्या बलाढ्य सत्तेला ललकारत, ‘मोरिया’ नावाच्या बोटीच्या पोर्टहोलमधून फ्रान्सच्या मार्सेलीस बंदरावर सावरकरांनी मारलेली ती उडी गुलामगिरीच्या बेड्या झुगारून देण्याची, मायभूमीला स्वतंत्र करण्याची आणि भारतीय तरुणांच्या रक्तामध्ये क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवणारी एक ऐतिहासिक झेप होती असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिका वैशाली पंडित यानी मसूरे येथे बोलताना केले.

मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई आणि स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र विलेपार्ले यांच्या संयुक्त विद्यमानाने आर. पी. बागवे हायस्कूल, मसुरे च्या सभागृहामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या मार्सेलिस पराक्रम स्मरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी संस्था अध्यक्ष डॉ. दीपक परब, जि प सदस्य क्षमा हडकर,माजी जि प अध्यक्ष सौ. सरोज परब, उद्योजीका सौ. राधिका परब, राजन परब, पंढरीनाथ नाचणकर, पपू मुळीक, प्र. मुख्याध्यापिका संजना मसूरेकर, मालवण ता. पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, अर्चना कोदे, किसन दुखंडे, पत्रकार सुयोग पंडित, कांबळे सर, पपू मुळीक, रमेश पाताडे, समीर नाईक, शशांक पिंगुळकर, सुनिल बांदेकर, मंदार पाटील, आर्या भोगले, विशाखा जाधव, सानिका वायंगणकर, अनिल मेस्त्री, शाहू ठुबे, श्री ठाकूर, तसेच बागवे हाय., केंद्रशाळा मसुरे , देऊळवाडा हाय., इंग्लिश मिडीयम स्कुल विध्यार्थी उपस्थित होते. प्रस्ताविक संजना मसूरकर यांनी केले

यावेळी बोलताना संस्था अध्यक्ष आणि उद्योजक श्री दीपक परब यांनी अथांग समुद्र, पाठीवर गोळ्या झेलण्याची भीती, तरीही मातृभूमीसाठी घेतलेली ती झेप, सावरकरांचे ते साहस आपल्याला संकटांशी लढण्याची आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देते. ८ जुलै 1910 रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी फ्रान्समधील मार्सेलिस बंदरात एस.एस. मोरिया जहाजाच्या खिडकीतून अथांग समुद्रात ऐतिहासिक उडी मारून अद्वितीय धैर्य, राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्यप्रेमाचा अभूतपूर्व आदर्श जगासमोर ठेवला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील या सुवर्णक्षणाचे स्मरण व्हावे आणि विद्यार्थ्यांना त्यातून राष्ट्रप्रेम, धैर्य व प्रेरणा मिळावी, या उद्देशाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

यावेळी पत्रकार सुयोग पंडित यानी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यसनापासून लांब राहण्याची उडी जीवनात घ्यावी असे आवाहन केले.यावेळी संस्थेच्या वतीने वैशाली पंडित यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन डी. टी. पेडणेकर यांनी तर आभार श्री कांबळे यानी मानले.

You cannot copy content of this page