सतीश सावंत यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश…

मंत्री नितेश राणें यांच्या उपस्थितीत प्रवेश:ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का..

⚡कणकवली ता.०१- ठाकरे शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला असून, सतीश सावंत यांनी अखेर पालकमंत्री तथा भाजप नेते नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

हा पक्षप्रवेश कणकवली–हरकूळ बु. येथील ‘कोकण रिट्रीट हॉल’ येथे पार पडला.नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात सुरू असलेल्या पक्षप्रवेशाच्या झंझावातामुळे उबाठा शिवसेना पूर्णतः अस्ताव्यस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे. उबाठाचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेते भाजपमध्ये दाखल होत असून, त्यामुळे ठाकरे शिवसेनेची संघटनात्मक पकड सैल होत चालली आहे.आज झालेल्या सतीश सावंत यांच्या पक्षप्रवेशामुळे उबाठा शिवसेनेला राजकीयदृष्ट्या मोठा झटका बसला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे विशेष महत्त्व दिले जात आहे.

You cannot copy content of this page