केंद्रीय अर्थसंकल्प थोडी ख़ुशी थोडी गम ; एम. के. गावडे…

⚡वेंगुर्ला ता.०१-: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प 2026 म्हणजे थोडी ख़ुशी – थोडी गम असेच म्हणावे लागेल. दरम्यान कोकणासाठी कृषिसाठी स्वतंत्र पॅकेज ची घोषणा आवश्यक व अपेक्षित होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा कृषिभूषण एम. के. गावडे यांनी वेंगुर्ला येथे बोलताना व्यक्त केली. श्री. गावडे म्हणाले, आज येथील शेतकरी यांच्यासाठी अर्थसंकल्पमध्ये आणखी तरतुदी आवश्यक होत्या. काजू आयात शुल्क वाढणे गरजेचे होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढते पर्यटन पाहता पर्यटक यांच्यासाठी विशेष पॅकेज तरतूद नाही. वैभववाडी रेल्वेमार्ग साठी तरतूद होणे आवश्यक होते. पर्यटनदृष्ट्या बिचेस व इतर घटकासाठी तरतूद होणे भविष्यात अपेक्षित आहे. गेल्या अर्थसंकल्प तुलनेत यावेळी सामान्य माणसासाठी काही बदल आवश्यक होते. पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे भाव थोडीतरी कमी होणे आवश्यक होते, त्यामुळे थोडीशी महागाई कमी झाली असती. कॅन्सर व मधुमेह बाबतीत विविध औषधाच्या किमती कमी करण्यात आलेला निर्णय स्वागतारह आहे. त्यामुळे गोरगरिबांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान सागरी महामार्ग लवकरात लवकर होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page