⚡वेंगुर्ला ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाकडून सखाराम उर्फ दादा सचिन सारंग हे महायुती व ठाकरे शिवसेना उमेदवार यांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत. दादा सारंग यांनी आज रविवारी 1 फेब्रुवारी रोजी
वेतोरे ग्रामदेवता श्री देवी सातेरीचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. तसेच नारायण गौतमेश्वर मंदिर, सातेरी – गिरोबा, भद्रकाली दाभोली मंदिर खानोली रवळनाथ मंदिर येथील देव देवतांना नतमस्तक होऊन,आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष योगेश कुबल, नाना पंडित, सचिन सारंग, प्रणय मिशाळे, मनोज मांजरेकर, मंदार माडकर, विलास परब, सिद्धेश हळदणकर, गुरुदत्त कांदळकर व विभागातील ग्रामस्थ उपस्थित होते. वाढलेली महागाई, बेरोजगारी, ग्रामीण भागातील रखडलेला विकास, युवकांचे प्रश्न याविरोधात थेट लढा देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचा निर्धार त्यांनी बोलताना व्यक्त केला.
वेतोरे श्री देवी सातेरीचे दर्शन घेऊन दादा सारंग यांचा प्रचाराचा शुभारंभ…
