⚡मालवण ता.०१-:
चौके कुळकरवाडी येथील श्री दत्त मंदिर या ठिकाणी श्री गुरू प्रतिपदा उत्सव व श्री गणेश, श्री दत्त, प. पू. भालचंद्र महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा २३ वा वर्धापन दिन सोहळा सोमवार दि. २ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त सकाळी ८ ते ११ पालखी मिरवणूक, सकाळी ११ ते दुपारी १२ श्रींची पूजा, दुपारी १२. वाजता श्रींची आरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ वाजता बक्षीस वितरण, सांयकाळी ७ वाजता श्रींची आरती, ७.३० वाजता भजने, रात्री ९.३० श्री दुगदिवी पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, कुणकावळे यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्तराज मित्रमंडळ, चौके यांनी केले आहे.
