माझी स्पर्धा विकास कामांवरच…

संदीप गावडे: डोअर टू डोअर प्रचारात जोरदार आघाडी…

⚡सावंतवाडी ता.०२-:
तळवडा जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संदीप गावडे यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली असून त्यांचा डोअर टू डोअर प्रचार जोरात सुरू आहे. या मतदारसंघाकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले असून ‘कोणाच्या बाजूने मतदारांचा कौल जाणार?’ याकडे उत्सुकता वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून संदीप गावडे यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचाराला वेग दिला आहे. ते प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन आपले विकासनिष्ठ पत्रक वाचून दाखवत लोकांचा आशीर्वाद घेत आहेत. या थेट संपर्कामुळे नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत असून त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी बोलताना संदीप गावडे म्हणाले की, “मी कोणाच्या विरोधात लढतोय, यापेक्षा माझी स्पर्धा ही फक्त विकास कामांशी आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा अजेंडा असून त्यावरच जनता मला कौल देईल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page