अपक्ष जितेंद्र गावकर: नऊ तारखीला गुलाल हा आपलाच..
⚡सावंतवाडी ता.०२-: सोनुर्ली गावात अपक्ष उमेदवार जितेद्र गावकर यांनी झंझावाती प्रचार केला. जनता माझ्या पाठीशी असून आपला विजय हा निश्चित आहे असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला.
माजगाव पंचायत समितीसाठी जितेंद्र गावकर यांनी अपक्ष रिंगणात उडी घेतली आहे. ही जागा ओपनसाठी सुटली असतांना तेथे ओपन उमेदवार न देता अन्य उमेदवार दिल्याने त्यांनी बंड करत उमेदवारी लढविण्याचा निश्चय केला. त्यांच्या या भूमिकेला जनतेतून प्रचंड प्रतिसाद लावत असून रिक्षा या निशाणी सह ते संपूर्ण मतदारसंघांमध्ये प्रचारामध्ये उतरले आहेत आज सोनुर्ली गावामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांसह घरोघरी प्रचार केला यावेळी जनतेचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जनतेचा प्रतिसाद आणि वेत्ये गावाची साथ लक्षात घेता आपला विजय हा निश्चित आहे येणाऱ्या 9 तारीखला गुलाल हा आपलाच असणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
