Headlines

भोसले स्कूलच्या विद्यार्थ्यांची जिव्हाळा व संविता आश्रमाला भेट…

सीबीएसईच्या सेवा उपक्रमांतर्गत सहभाग… ⚡सावंतवाडी ता.१६-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या ‘सेवा – कार्यशिक्षण व कृतीद्वारे सामाजिक सशक्तीकरण’ या उपक्रमांतर्गत कुडाळ येथील जिव्हाळा आश्रम तसेच पणदूर येथील संविता आश्रमाला भेट दिली. हा उपक्रम इयत्ता ९वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई बोर्डाच्या हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन या विषया अंतर्गत राबविला जातो. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये समाजभान, सहानुभूती,…

Read Full News

वायरीबांध येथे सदानंद माऊली महाराज ध्यानमंदिर वर्धापन दिन व कुमारिका पूजन सोहळा…

⚡मालवण ता.१६-:श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज संप्रदाय, मालवण यांच्या वतीने श्री क्षेत्र दत्तमंदिर, वायरीबांध मालवण येथे परमपूज्य श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज ध्यानमंदिर वर्धापन दिन सोहळा तसेच कुमारिका पूजन सोहळा गुरुवार दि. १८ व २३ डिसेंबर रोजी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष श्री विलास (बापूजी) झाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त १८ डिसेंबर…

Read Full News

पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने कुणकेरीतील रहिवाशांचे आंदोलन..

⚡सावंतवाडी ता१६.-:कुणकेरी गावातील गावडेवाडी येथील रहिवासी श्री. दीपक आना मेस्त्री यांनी ग्रामपंचायत कुणकेरीच्या दुर्लक्षाविरोधात थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायरीवर बसून आंदोलन छेडले. दि. २५/११/२०२५ ते ०२/१२/२०२५ या कालावधीपासून गावडेवाडी परिसरात पाणीपुरवठा पूर्णतः विस्कळीत असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप श्री. मेस्त्री यांनी केला आहे. घरगुती वापरासाठी पाणी मिळत…

Read Full News

राजन तेली यांच्या घरी वैभव नाईक यांची भेट…

अर्धा तास झाली चर्चा ; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण. कणकवली : शिंदे सेनेचे नेते तथा माजी आमदार राजन तेली व उद्धव ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची कणकवलीत मधील तेली यांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री भेट झाली. अर्धा तास या दोघांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे. यामध्ये कणकवली नगरपंचायत निवडणुकी संदर्भात चर्चा…

Read Full News

तपोभूमी दिनदर्शिका २०२६ चे सावंतवाडी पत्रकार कक्षात अनावरण…

⚡​सावंतवाडी ता.१६-: पद्मनाभ शिष्य सांप्रदाय, तपोभूमी, कुंडई (गोवा) यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘तपोभूमी दिनदर्शिका २०२६’ चे अनावरण सावंतवाडी येथील तालुका पत्रकार कक्षामध्ये ​सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना रेडकर यांनी, तपोभूमीचे कार्य आणि पद्मनाभ शिष्य सांप्रदायाचे सामाजिक व अध्यात्मिक योगदान महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले.​ ​या प्रकाशन…

Read Full News

मलपीतील हायस्पीड ट्रॉलर्सकडून पारंपारिक मच्छिमारांच्या जाळ्यांचे नुकसान…

रात्रीच्या वेळी मालवणच्या समुद्रात थरार:कारवाईसाठी मच्छिमार आक्रमक… ⚡मालवण ता.१५-:मालवणसह जिल्ह्याच्या समुद्रात केरळ मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर्सचा धुमाकूळ सुरु असून काल रात्री मालवण समोरील जुवा क्षेत्रातील १७ वाव समुद्रात झुंडीने आलेल्या हायस्पीड ट्रॉलर्सनी धुरीवाडा येथील पारंपारिक मच्छिमार हेमंत जोशी यांच्या नौकेवर चाल करीत त्यांची समुद्रात टाकलेली प्रत्येकी २५ किलो वजनाची न्हय मासेमारीची २० जाळी तोडून चोरून…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कार्याचे आमदार निलेश राणेंकडून कौतुक…

महायुतीत सकारात्मक वातावरण राखण्याचे आवाहन:तर वैयक्तिक अजेंडा बाजूला ठेवून संवाद व चर्चेतून मार्ग निघू शकतो.. ⚡कणकवली ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे हे संचालक मंडळासह ‘शेतकऱ्यांची बँक’ म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सहकार क्षेत्रात सर्वोत्तम बनविण्यासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे मत आमदार निलेश राणे यांनी व्यक्त…

Read Full News

कणकवली कॉलेज येथे ‘डिजिटल जगातून वास्तवाकडे’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जनजागृतीपर कार्यक्रम…

अनुभव शिक्षा केंद्र आणि DLLE विभागाचे आयोजन.. कणकवली : अनुभव शिक्षा केंद्र तसेच कणकवली कॉलेज, कणकवली येथील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग (DLLE) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल जगातून वास्तवाकडे’ या विषयावर शैक्षणिक जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दि. १२ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत एच. पी. सी. एल. सभागृह,…

Read Full News

वंचित राहिलेल्या ९७० शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसानीची रक्कम मिळवून द्या…

वैभव नाईक व सतीश सावंत यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत केली मागणी.. ⚡ओरोस ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९७० शेतकऱ्यांना अजूनही फळपीक विम्याची रक्कम मिळालेली नाही त्यामुळे आज माजी आमदार वैभव नाईक व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची ओरोस येथे भेट घेऊन वंचित राहिलेल्या त्या ९७० शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसानीची…

Read Full News

मालवणात १९ रोजी कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम…

⚡मालवण ता.१५-:महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामीण रुग्णालय येथे दि.१९ डिसेंबरला कर्क रोग तपासणी व जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत कर्करोग मोबाईल व्हॅनच्या साहाय्याने मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग यांची तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेद्वारे नागरिकांमध्ये कर्करोगाच्या लक्षणांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा…

Read Full News

You cannot copy content of this page