Headlines

शस्त्रक्रियेनंतर युवतीचा मृत्यू…

डॉक्टरच्या हलगर्जीपणाचा आरोप करत ग्रामस्थांनी मृतदेह ठेवला रुग्णालयाच्या दरवाजावर.. ⚡कणकवली ता.१४-:डोक्यावरील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया कणकवलीतील खासगी रुग्णालयात पार पडल्यानंतर रक्तस्त्राव थांबत नसल्याने कोल्हापूर येथे हलविण्यात आलेल्या १९ वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी युवतीचा मृतदेह थेट संबंधित खासगी रुग्णालयाच्या दारात ठेवत तीव्र आंदोलन केले. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच युवतीचा नाहक बळी गेला…

Read Full News

८ वर्षांच्या पुर्वांक कोचरेकरची राष्ट्रीय बुद्धिबळात चमकदार कामगिरी…

आंतरराष्ट्रीय रेटेड ५ खेळाडूंवर मात करत पुर्वांकने वेधले लक्ष:विशाल परब यांच्याकडून शुभेच्छा.. ⚡सावंतवाडी ता.१४-: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेपूर्वी लोकमत महा गेम्स अंतर्गत आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत पुर्वांक कोचरेकर याने प्रथम क्रमांक पटकावून आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला होता. या यशानंतर राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या प्रगतीचा आलेख अधिक उंचावला आहे. पुर्वांकच्या या दैदीप्यमान यशाबद्दल भाजप युवा…

Read Full News

आरपीडीची अस्मी मांजरेकर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गटातून प्रथम…

मृणाली पवार द्वितीय तर प्राथमिक गटातून पार्थ सावंत उत्तेजनार्थ.. सावंतवाडी : आरपीडी हायस्कूलची अस्मी प्रवीण मांजरेकर ( ‘माझा आवडता कवी’ – कुसुमाग्रज ) हिने बांदा येथील नट वाचनालयात घेण्यात आलेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक पटकाविला.तर मृणाली मोहन पवार (‘माझा आवडता कवी’ – स्वातंत्र्यवीर सावरकर) हिने द्वितीय क्रमांक…

Read Full News

कडाक्याच्या थंडीत गारठल्याने कणकवलीत तरुणाचा मृत्यू…

कणकवली : थंडीत गारठल्याने कणकवलीत एका तरुणाचा मृत्यू झाला. नितीन धोंडू जगताप (वय ४५ राह. भरणी) असे त्याचे नाव आहे. शहरातील लक्ष्मी चित्र मंदिर लगत असलेल्या इमारतीखाली त्याचा मृतदेह आज सकाळी स्थानिकांना आढळून आला त्यानंतर याबाबतची माहिती कणकवली पोलिसांना देण्यात आली. पोलीस हवालदार विनोद चव्हाण घटनास्थळी दाखल झाले होते. नितीन जगताप हा कणकवली शहरात हॉटेल…

Read Full News

मळगाव येथील दोन गावचा पूर्वस देवाचा आज वार्षिक जत्रोत्सव…

सावंतवाडी : मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे जागृत दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन गावचा पूर्वस देवाचा आज रविवार १४ डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत.सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणे दोन पूर्वस हे मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे जागृत देवस्थान आहे. श्री…

Read Full News

नट वाचनालयात शालेय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात…

⚡बांदा ता.१४-: येथील नट वाचनालयात (कै.) शशिकांत नाडकर्णी पुरस्कृत त्यांचे वडील (कै.) शांताराम नाडकर्णी व त्यांची आई (कै.) शांताबाई नाडकर्णी यांचे स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या शालेय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात अस्मि मांजरेकर (आरपीडी हायस्कुल, सावंतवाडी) तर लहान गटात भक्ती केळुस्कर (माध्यमिक विद्यालय, इन्सुली) या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेला दोन्ही गटात स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.सदर…

Read Full News

बांदा प्रभाग स्तरीय महोत्सवात पीएमश्री केंद्रशाळा बांदा नं. १ ची घवघवीत कामगिरी…

⚡बांदा ता.१४-: बांदा प्रभाग स्तरीय बाल, कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव मध्ये येथील पीएमश्री केंद्रशाळा बांदा नं. १ ने घवघवीत यश प्राप्त करून २०२५ ची चॅम्पियन शिप मिळवली आहे.सविस्तर निकाल पुढीलप्रमाणेसांघिक खेळ-विजेते- रिले (लहान गट मुलगे), रिले (लहान गट मुली), रिले (मोठा गट मुलगे), रिले( मोठा गट मुली), कबड्डी (मोठा गट मुली), खोखो…

Read Full News

असनीयेतील वीज काम रखडले…

बागायती धोक्यात: पुन्हा आंदोलनाचा इशारा.. ⚡बांदा ता.१४-: असनीये गावातील जीर्ण वीज वाहिन्या व विद्युत खांब बदलण्यासाठी ग्रामस्थांनी २२ जुलै रोजी केलेल्या आंदोलनानंतर ५० विजवाहिनी गाळे बसवणे व सर्व जुने विद्युत पोल बदलण्याचे आश्वासन महावितरण कडून देण्यात आले होते. मात्र अद्यापही काम अर्धवट स्थितीत असून शेतीपंप बंद असल्याने बागायती करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. बागांना…

Read Full News

कणकवली नगर वाचनालयातर्फे संस्कृत व्याकरण कार्यशाळेचे आयोजन…

⚡कणकवली ता.१३-: कणकवली नगर वाचनालयातर्फे प्रतिवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृत व्याकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा रविवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी ८:३० ते १२:३० या वेळेत नगर वाचनालयाच्या अप्पासाहेब पटवर्धन सभागृहात होणार आहे. या कार्यशाळेसाठी पुणे येथील प्रख्यात संस्कृत शिक्षिका आरती विनय…

Read Full News

कणकवली शहरातील कनकनगर व बिजलीनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा…

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची लघु पाटबंधारे विभागाकडे मागणी.. कणकवली : कणकवली शहरातील बिजलीनगर व कनकनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या शिंदे मॅडम यांच्याकडे केली आहे. येत्या ८ दिवसात बिजलीनगर व कनकनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा. अशी मागणी…

Read Full News

You cannot copy content of this page