Headlines

मालवण तालुकास्तरीय ५३ व्या विज्ञान प्रदर्शनाचे निकाल जाहीर…

दत्ताराम लाड आणि ओम आंबेरकर यांच्या प्रकल्पांना प्रथम क्रमांक… ⚡मालवण ता.१४-:मालवण तालुकास्तरीय ५३ व्या विज्ञान प्रदर्शन २०२५-२६ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात विद्यार्थी प्राथमिक गटात आडवली हायस्कूलच्या दत्ताराम लाड याच्या जीवन रक्षक प्रणाली या प्रकल्पास तर माध्यमिक गटात टोपीवाला हायस्कूलच्या ओम आंबेरकर याच्या प्रोजेक्स एआय ऑफलाईन, ऑनलाईन असिस्टंट या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला.विज्ञान…

Read Full News

माळगाव रवळनाथ वार्षिक जत्रोत्सव १६ पासून…

⚡मालवण ता.१४-: माळगाव श्री देव रवळनाथ वार्षिक जत्रोत्सव १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. मंगळवार, १६ रोजी श्री देव रवळनाथ मंदिरात ओट्या भरणे, गाऱ्हाणे, नवस बोलणे व फेडणे, रात्री देव तरंगासह सवाद्य पालखी मिरवणूक, त्यानंतर पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.

Read Full News

संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे…

कुडाळ : महाविद्यालयीन जीवनातील काही अविस्मरणीय क्षणांपैकी एक क्षण म्हणजे महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन, या अविस्मरणीय क्षणांचे साक्षिदार ठरत संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे केले.स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आयर्नमॅन किताब संपादन केलेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, उद्योजक, प्रमोद भोगटे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्ज्वलन,नटराजांना पुष्पहार अर्पणकरुन व श्रीफळ वाढवून झाले.क.म.शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्री.अरविंद शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये…

Read Full News

रुग्णाच्या मृत्यूने आम्हीही शोकमग्न…

तोडफोडीबाबत तक्रार करणार नाही – डॉ. अनंत नागवेकर.. कणकवली : नातेवाईकांचा तीव्र संताप, रूग्‍णालयाची तोडफोड, डॉक्‍टरांना मारहाणीचा प्रयत्‍न आणि प्रचंड पोलीस फौजफाटा यामुळे कणकवलीतील त्‍या रूणालयातील वातावरण प्रचंड तंग झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री नितेश राणे यांनी मोबाईलवरून मृत युवतीच्या नातेवाईकांशी मोबाईलवरून संवाद साधला. त्‍यानंतर रूग्‍णालय परिसरातील तणाव निवळला. दरम्‍यान युवतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी…

Read Full News

बांदा येथील नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूलची दुर्वा नार्वेकर लहान गटातून तृतीय…

तर मोठ्या गटातून वैभवी परब उत्तेजनार्थ.. ⚡सावंतवाडी ता.१४-: बांदा येथील नट वाचनालयात घेण्यात आलेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेत लहान गटातून मळगाव इंग्लिश स्कूल मळगावची दुर्वा गोपाळ नार्वेकर हिने तृतीय क्रमांक पटकविला. तर मोठ्या गटातून वैभवी गोविंद परब हिने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. कै. शशिकांत शांताराम नाडकर्णी, बांदा यांच्या कायम ठेव देणगीतून…

Read Full News

कणकवलीत वातावरण तापले…

कडेकोट पोलीस बंदोबस्त, दंगल नियंत्रक पथकाला पाचारण.. कणकवली : युवतीच्या मृत्‍यूनंतर संतापलेल्‍या ग्रामस्थांनी त्‍या खासगी रूग्‍णालयाची तोडफोड केली. त्‍यामुळे रूग्‍णालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच दंगलनियंत्रक पथकालाही पाचारण करण्यात आले अाहे. तालुक्यातील एका कॉलेजमध्य कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. तिच्या डोक्‍याच्या मागील बाजूला गाठ आली होती. दोन तासात किरकोळ ऑपरेशन केल्‍यानंतर रूग्‍ण घरी जाईल…

Read Full News

द. कृ. वाडकर कृतज्ञता निधी कथाकथन स्पर्धा २४ डिसेंबर रोजी…

श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडीच्यावतीने स्पर्धेचे आयोजन.. सावंतवाडी : सावंतवाडी तालुकास्तरीय द. कृ. वाडकर कृतज्ञता निधी कथाकथन स्पर्धेचे येथील श्रीराम वाचन मंदिरच्यावतीने बुधवार, २४ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडीच्यावतीने माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ समाजवादी दिवंगत नेते कै. दत्ताराम वाडकर यांनी संस्थेकडे कायमस्वरूपी ठेवलेल्या ठेव रकमेच्या…

Read Full News

शाळा नं. २ परिसरात चार नवे स्ट्रीट लाईट..

नागरिकांचा प्रवास सुरक्षित:देव्या सूर्याजी यांनी मानले प्रशासनाचे आभार.. ⚡सावंतवाडी, ता. १४ :शहरातील मोक्याच्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण निधीतून स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी येथील शाळा क्रमांक २ च्या बाजूला चार नवीन स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामास आज सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शाळा नं. २ च्या बाजूची संरक्षक भिंत कोसळल्याने…

Read Full News

ओपीडीला अद्याप मंजुरी नाही…

तरीही श्रेय घेण्याचा प्रयत्न: आशिष सुभेदारांची दीपक केसरकरांवर टीका.. ⚡सावंतवाडी ता.१४-: धारगळ येथील आयुर्वेदिक संस्थांनाच्या माध्यमातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय ओपीडी सुरू करण्याचा फक्त प्रस्ताव देण्यात आला आहे मात्र अदयाप पर्यंत अधिकृत मंजुरी मिळालेली नाही असे असताना आमदार दीपक केसरकर व त्यांच्या सहका-यांनी ओपीडी सुरू झाल्या सारखे वातावरण करून आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रकार केला आहे…

Read Full News

सासोली येथे घरफोडी;दागिने,रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला…

⚡दोडामार्ग, ता.१४-:सासोली – वाघमळा येथे अज्ञात चोरट्यांनी गणपत संभाजी देसाई यांचे घर फोडून लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.चोरट्यांनी शनिवार, दि.१३ डिसेंबर रोजी घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत चोरी केली.याबाबत दोडामार्ग पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून नेमकी माहिती पोलिसांकडून काही वेळाने देण्यात येणार आहे.चोरट्यांनी घरात घुसून आतील खोल्यातील लोखंडे कपाट फोडून रोख…

Read Full News

You cannot copy content of this page