⚡मालवण ता.०१-:
मसुरे जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सौ. आनंदी आबा परब आणि मसुरे पंचायत समिती मतदार संघांचे उमेदवार वैभव सुरेश चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ मसुरे टोकळवाडी येथे करण्यात आला. या प्रचारादरम्यान उबाठा शिवसेना पक्षाच्या उमेदवार सौ. आनंदी परब व वैभव चव्हाण यांनी घरोघरी जाऊन प्रचार पत्रकांचे वाटप करून या भागाच्या विकासासाठी मतदारांनी आपल्याला विजयी करावे, असे आवाहन केले.
यावेळी मसुरे भागातील उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी सौ. आनंदी परब आणि वैभव चव्हाण यांना भरघोस मताधिक्य देण्याचा निर्धार केला. या प्रचारादरम्यान जि. प. चे माजी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, मसुरे विभागप्रमुख सुहास पेडणेकर, युवासेना उप तालुकाप्रमुख अमित भोगले, मंगेश हडकर, आबा पारब, राहुल सावंत, शशांक माने, हेमंत परब, दिलीप परब, अदिती मेस्त्री सुजाता पेडणेकर, यासह बहुसंख्य ठाकरे शिवसैनिक व इतर उपस्थित होते.
