
एस्. एम्.हायस्कूल, कणकवलीचे श्री. आर. जी. पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन…
कणकवली : एस्. एम्. हायस्कूल, एम्.सी.व्ही.सी. विभाग, कणकवलीचे रविंद्र गोविंद पाटील (वय- ५६) यांचे आज ११ जून रोजी सकाळी ६ वाजता कोल्हापूर येथील रुग्णालयामध्ये हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने -निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने एस्. एम्. हायस्कूल, कणकवली वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.