कळसुली येथील श्री. स्वयंभू भोगनाथ मंदिरात १४ जानेवारी रोजी हरिनाम सप्ताह…

⚡कणकवली ता.१३-: तालुक्यातील कळसुली श्री. स्वयंभू भोगनाथ मंदिर, भोगनाथवाडी, येथे दरवर्षीप्रमाणे बुधवार, १४ जानेवारी २०२६ रोजी हरिनाम सप्ताहानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता घटस्थापना व आरतीने होणार असून सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ग्रामस्थांची भजने आयोजित करण्यात आली आहेत. सायंकाळी ७ वाजता श्री देव भोगनाथ विद्यामंदिर, कळसुली नं. ३ च्या मुलांची दिंडी सादर होणार आहे.

रात्री ८ वाजता हरिपाठ, रात्री ९ वाजता पावणादेवी महिला प्रासादिक भजन मंडळ, सातरल खालचीवाडी, रात्री १० वाजता सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ, जानवली, तसेच रात्री ११:३० वाजता महापुरुष प्रासादिक दिंडी भजन मंडळ, श्रावण यांची भजने होणार आहेत. रात्री १२ वाजता दिंडी काढण्यात येणार असून रात्री १ ते पहाटे ५:३० वाजेपर्यंत स्थानिक ग्रामस्थांची भजने सुरू राहतील.

गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५:३० वाजता काकड आरती व त्यानंतर घट विसर्जन करण्यात येणार आहे.

या हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्री.देव भोगनाथ मित्रमंडळ, कळसुली व कळसुली भोगनाथ रहिवासी संघ, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.तरी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page