नगरसेविका ॲड.सायली दुभाषी यांची प्रशासनाकडे मागणी ; छोट्या कचराकुड्यामुळे स्वच्छतेचा बोजबारा…
⚡सावंतवाडी ता.१४-:
शहरातील मोती तलावा काठी नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छोट्या कचराकुंड्यातील कचरा फूटपाथवर पसरत असल्याने सकाळच्या वेळी मॉर्निंग वाॅकला येणाऱ्या नागरिकांना अस्वच्छतेचा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतो एकूणच या प्रकारामध्ये नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने यावर तात्काळ उपाय योजना म्हणून मोठ्या कचराकुंड्याचा वापर करावा अशी मागणी नगरसेविका अॅड सायली दुभाषी यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
नगरसेविका सौ दुभाषी यांनी, फुटपाथ वरील कचऱ्या कुंड्या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.त्याच्या म्हणण्यानुसार नगरपरिषद प्रशासनाने मोती तलावाच्या फुटपाथवर छोट्या कचराकुंड्या उभारले आहेत तलावा काठी हॉटेल व्यवसायिक तसेच आईस्क्रीम पार्लर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत या ठिकाणी येणारे पर्यटक आपला कचरा छोट्या कचराकुंड्यामध्ये टाकतात परंतु या कचरा कुंड्या छोट्या असल्याने त्यातील कचरा मोकाट कुत्रे तसेच जनावरे बाहेर काढतात हा कचरा फुटपाथवर तसेच बाजूच्या रस्त्यावर पसरत असल्याने सकाळच्या वेळी मॉर्निंग वाॅकला फिरणाऱ्या ज्येष्ठ नागरिक तसेच अन्या नागरिकांना या कचऱ्याचा सामना करावा लागतो परिणामी दुर्गंधी आणि अस्वच्छता त्या त्या परिसरामध्ये निर्माण होते एकीकडे स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासन कटीबद्ध असताना अशा छोट्या कचराकुंडल्यामुळे निर्माण होणार्या अस्वच्छतेकडे मात्र त्यांचा पूर्णतः कानडोळा आहे. प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष द्यावा शिवाय छोट्या कचराकुंड्याच्या जागी मोठ्या कचराकुंड्या बसवल्यास त्यातील कचरा मोकाट जनावरे बाहेर काढणार नाहीत त्यामुळे अस्वच्छतेचा प्रश्न उद्भवणार नाही. प्रशासनाने माझ्या या मागणीचा विचार करावा तसेच हा मुद्दा आपण प्रशासनाकडे लावून धरणार असून स्वच्छ सावंतवाडीसाठी आपला नेहमीच पुढाकार राहणार आहे.
