शिरवंडे येथे महिला शेतीशाळेचा शुभारंभ

*सुनिल घाडीगावकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ *💫मालवण दि.०२-:* शिरवंडे येथे तालुका कृषि अधिकारी, मालवण यांचे मार्गदर्शनाखाली महिला शेतीशाळेचा शुभारंभ पंचायत समिती सदस्य श्री.सुनिल घाडीगावकर यांचे उपस्थितीत करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय कृषि विकास योजनेतुन बचत गटातील महिलांना चवळी बियाण्याचे वाटप करण्यात आले. कृषि पर्यवेक्षक श्री.सचिन गवंडे यांनी बचत गटातील महिलांना चवळी लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली. तसेच…

Read More

मसुरे देऊळवाडा वेताळटेंब येथील विन्या या नकलाकाराचे जीवन वार्धक्यामुळे कठीण

*💫मालवण दि.०२-:* मसुरे देऊळवाडा वेताळ टेंब येथील विनायक विष्णू परब उर्फ़ विन्या या नकलाकाराचे जीवन वयाच्या ७० व्या वर्षी वार्धक्यामुळे कठीण झाले आहे. तो आजच्या घडीला उतारवयमुळे तसेच काहीशा आजारामुळे बेजार अवस्थेत जीवन कंठत आहे.या व्यक्तीला आयुष्यात बऱ्याच संकटांना तोंड द्यावे लागले होते. वयाच्या दहा ते पंधराव्या वर्षांतच आईवडिलांचे छत्र हरपल्याने खऱ्या अर्थाने विन्या पोरका…

Read More

शेतविहिरीत पडलेल्या रानडुक्कराला वनविभाग आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून जीवनदान

*💫मालवण दि.०२-:* मालवण तालुक्यातील सुकळवाड पाताडेवाडी येथील शेतविहिरीत पडलेल्या रानडुक्कराला जीवदान देण्यात वनविभाग व ग्रामस्थांना यश आले.कृष्णा पाताडे यांच्या जुन्या शेतविहिरीत काल दुपारी विहिरीला कठडा नसल्याने रानडुक्कर पडल्याचे निदर्शनास येताच पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी वनविभागाला याची कल्पना दिली. वनविभागाचे कर्मचारी येईपर्यंत रानडुक्कर विहिरीत सतत पोहत असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी दोरीच्या सहाय्याने पकडून विश्रांती दिली….

Read More

जिल्ह्यातील बारा केंद्र प्रमुखांना प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ‘सरल’ प्रणालीचे एक दिवशीय प्रशिक्षण

*💫सिंधूदुर्गनगरी दि.०२-:* जिल्ह्यातील बारा केंद्र प्रमुखांना त्यांच्या मागणी नुसार प्राथमिक शिक्षण विभागाने ‘सरल’ प्रणालीचे एक दिवशीय प्रशिक्षण मंगळवारी दिले आहे.शासनाने शिक्षण संबंधी सर्व माहिती ऑनलाईन घेण्यास सुरुवात केलेली आहे. यासाठी ‘सरल’ प्रणाली ही वेबसाइट विकसित केली आहे. या प्रणालीमध्ये शिक्षकांना आपली दैनंदिन माहिती भरावी लागते. विद्यार्थी, शिक्षक व शाळा संबंधी सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने सरल…

Read More

वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम संपन्न

आ. वैभव नाईक, संग्राम प्रभुगावकर, नागेंद्र परब यांनी केले मार्गदर्शन *💫कुडाळ दि.०२-:* वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात कडावल येथे शिवसेना सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम आज पार पडला. कुडाळ तालुक्यात शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा आजचा दुसरा दिवस असून कडावल येथून याची सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवसेना सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने जोमाने काम करावे….

Read More

गोवा बनावटीच्या दारु वाहतूक प्रकरणी एकाला अटक

*💫बांदा दि.०२-:* जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा पोलिसांनी गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश येथील एकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सुमारे ७ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बांदा पोलिसांनी काल रात्री केली आहे. ही कारवाई जिल्हा वाहूत शाखेचे पोलिस अविनाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस…

Read More

१३ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ढोलताशांच्या गजरात घंटानाद आंदोलन….

आरपीआय जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांचा इशारा *💫सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वेळकाढूधोरण आणि चालढकलपणामुळे १३ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ढोलताशांच्या गजरात घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी दिला. यादव म्हणाले, लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क कायद्यानुसार नंददिपक अनंत जाधव यांना शासकीय नोकरीपासून वंचित का ठेवले…

Read More

कै. सौ. सरोज सूर्यकांत पेडणेकर स्मृती प्रित्यर्थ आयोजित बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

*मुख्य गटातून सावंतवाडीचा बाळकृष्ण पेडणेकर ठरला विजेता *💫सावंतवाडी दि.०२-:* मुक्ताई कॅरम व बुदधिबळ कोचिंग ॲकेडमीने आयोजित केलेल्या कै.सौ.सरोज सुर्यकांत पेडणेकर स्मृती प्रित्यर्थ पहिल्या जिल्हास्तरीय ऑनलाईन ब्लिट्ज बुदधिबळ स्पर्धेत सावंतवाडीचा बाळकृष्ण पेडणेकर विजेता ठरला आहे. कै.सौ.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या ऐक्याऐशीव्या जयंती निमित्त जिल्ह्यात पहिल्यांदाच ऑनलाईन बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्री.सुर्यकांत पेडणेकर यांनी प्रायोजित केलेल्या…

Read More

महिला बचत गटांची मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्ज माफ करा

*बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी* *💫सावंतवाडी दि.०२-:* महिला बचत गटांनी मायक्रो फायनान्स कंपन्याकडून घेतलेले कर्ज केंद्र व राज्य शासनाने त्या मायक्रो फायनान्स कंपन्याना देऊन महिलांना कर्ज माफी द्यावी अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना, उद्योगपतींना सरकारने कर्ज माफी दिली आहे. परंतु…

Read More

सावंतवाडी ते मुंबई नॉन एसी स्लीपर- सीटर एसटी बस सुरू….

आगार प्रमुख वैभव पडोळे यांची माहिती *💫सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी आगारातून मुंबईला जाणारी नॉन एसी स्लीपर – सीटर एसटी सेवा सुरू करण्यात आली असून, सावंतवाडी आगारातून संध्याकाळी ०६:०५ वाजता ही गाडी सुटणार असल्याची माहिती आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी दिली आहे. या गाडीचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.

Read More
You cannot copy content of this page